GST on Garba Dress: गरबा ड्रेसवरील GST 5 टक्क्यांवरून 12 टक्के होणार; पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये नागरीकांचा संताप

राज्य सरकारने वडोदरा, राजकोट सारख्या शहरांमध्ये गरबा इव्हेंटमध्ये प्रवेशासाठी प्रवेश पासेसवर जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने प्रवेश तिकिटांवर 18 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे, सरकार गरबा ड्रेस चनया-चोलीवरील जीएसटी दर वाढवण्याच्या विचारात आहे. सरकार गरबा ड्रेसवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्के करणार आहे.

GST on Garba Dress: गरबा ड्रेसवरील GST 5 टक्क्यांवरून 12 टक्के होणार; पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये नागरीकांचा संताप
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 10:17 PM

गांधीनगर : गरबा ड्रेसवरील जीएसटी(GST on garba dress) 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे गुजरातमध्ये गरब्यावरुन गदारोळ निर्माण होणार आहे. वन नेशन वन टॅक्स अशी घोषणा करत देश भरात लागू करण्यात आलेला जीएसटी हा व्यापऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी डोकेदुखीचा मुद्दा बनला आहे. तरीही लोकांच्या भावनेला बाजूला सारून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या कराचा विळखा वेळोवेळी घट्ट केला आहे. आताही मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या गृहराज्यात जनतेने गरबा खेळण्यावर लावलेल्या जीएसटीच्या मुद्द्यावर विरोध दर्शवला आहे. गुजरातमध्ये सध्या गरब्यावर लावण्यात आलेल्या जीएसटीवरुन विवाद सुरू झाला आहे.

गरबा ड्रेस आणि गरबा प्रवेश पासेसवर जीएसटी

सरकारने गरब्यावर लादलेल्या जीएसटीमुळे गुजरातमधील जनता नाराज आहे. त्यामुळेच गरब्यावर जीएसटी लावल्याने गोंधळ सुरू झाला आहे. गुजरातमध्ये नवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणात रास गरबा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राज्य सरकारने वडोदरा, राजकोट सारख्या शहरांमध्ये गरबा इव्हेंटमध्ये प्रवेशासाठी प्रवेश पासेसवर जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने प्रवेश तिकिटांवर 18 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे, सरकार गरबा ड्रेस चनया-चोलीवरील जीएसटी दर वाढवण्याच्या विचारात आहे. सरकार गरबा ड्रेसवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्के करणार आहे.

काँग्रेस, आपने भाजपा सरकारला घेरले

व्यावसायिक गरबा कार्यक्रमांच्या प्रवेश तिकिटांवर आकारला जाणारा 18% जीएसटी मागे घेण्याची मागणी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांनी सरकारकडे केली आहे.जीएसटी हटवण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आणि आपने वडोदरा, सुरत आणि वलसाडमध्ये निदर्शने केली. वडोदरा शहरातील काँग्रेस अध्यक्षांसह सुमारे 10 कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गरबा केला. तर, आप कार्यकर्त्यांनी सुरत आणि वडोदराच्या रस्त्यांवर गरबा केला, त्यानंतर अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कसे उघड झाले प्रकरण?

‘युनायटेड वे ऑफ बडोदा’ नावाच्या एनजीओने एंट्री पासची किंमत आणि जीएसटीची माहिती त्यांच्या वेबसाइटवर शेअर केली. यानंतर एंट्री पासवरील जीएसटीचा मुद्दा समोर आला. ही एनजीओ गरबा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ओळखली जाते. वेबसाइटनुसार, 9 दिवसांसाठी पुरुषांच्या पासची किंमत 4,838 रुपये आहे. ज्यामध्ये 4100 रुपये प्रवेश शुल्क आणि 18 टक्के जीएसटी म्हणजेच 738 रुपये समाविष्ट आहेत. महिलांना प्रवेशासाठी 1298 रुपये द्यावे लागतील, ज्यामध्ये 1,100 रुपये शुल्क आणि 198 रुपये जीएसटी समाविष्ट आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.