गुजरात काँग्रेसमध्ये भूकंप, चार आमदारांच्या राजीनाम्याने राज्यसभेच्या जागेला हादरा

संख्याबळ घटल्यामुळे काँग्रेसला आता गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांपैकी एकच जागा जिंकणे शक्य होणार आहे. Gujarat Congress MLA Resign

गुजरात काँग्रेसमध्ये भूकंप, चार आमदारांच्या राजीनाम्याने राज्यसभेच्या जागेला हादरा
Follow us
| Updated on: Mar 16, 2020 | 8:32 AM

अहमदाबाद : मध्य प्रदेशात वेगवान राजकीय घडामोडी घडत असतानाच गुजरातमध्येही काँग्रेसला हादरा बसला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिला आहे. राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे काँग्रेसचं धाबं दणाणलं आहे. (Gujarat Congress MLA Resign)

महाराष्ट्रासोबतच गुजरातमधील राज्यसभेच्या चार जागांसाठी 26 मार्चला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र त्याआधीच काँग्रेसच्या चार आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांना राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ 73 वरुन 69 वर घसरलं आहे.

संख्याबळ घटल्यामुळे काँग्रेसला आता राज्यसभेच्या चार जागांपैकी एकच जागा जिंकणे शक्य होणार आहे. गुजरातमध्ये एका जागेसाठी 36 मतांची गरज असते. त्यामुळे काँग्रेसची दुसरी जागा अवघ्या तीन मतांनी धोक्यात आली आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा आहेत.

कमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा, विश्वासमत चाचणी घेण्याचे मध्य प्रदेशच्या राज्यपालांचे आदेश

दुसरीकडे, सत्ताधारी भाजप मात्र तीन जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. भाजपकडे 103 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपला तिसऱ्या जागेसाठी फक्त 5 मतांची बेगमी करण्याची आवश्यकता आहे. ‘भारतीय ट्रायबल पार्टी’चे दोन, राष्ट्रवादीचा एक, तर एक अपक्ष आमदार आहे.

भाजपकडून अभय भारद्वाज, रमिला बारा, नरहरी अमिन यांना राज्यसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.

चार आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने 24 आमदारांना जयपूरला रवाना केले. घोडेबाजार टाळण्यासाठी खबरदारी म्हणून काँग्रेसने पावलं उचलल्याचं बोललं जातं.

काँग्रेसच्या चारही आमदारांचे राजीनामे स्वीकारल्याचं विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी स्पष्ट केलं. सोमवारी विधानसभेत त्या आमदारांची नावं जाहीर करणार असल्याचं त्रिवेंदींनी सांगितलं. (Gujarat Congress MLA Resign)

हा व्हिडीओ पाहिलात का? :

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.