‘अरुण जेटली असते तर शेतकरी आंदोलनावर एव्हाना तोडगा निघाला असता’

अरुण जेटली आज हयात असते तर शेतकरी ज्याप्रकारे समस्यांचा सामना करत आहेत, आंदोलन करत आहेत, ते इतक्या दीर्घकाळ सुरु राहिले नसते. | Sushil Modi

'अरुण जेटली असते तर शेतकरी आंदोलनावर एव्हाना तोडगा निघाला असता'
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 8:01 AM

पाटणा: अरुण जेटली (Arun Jaitley) आज असते तर दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest) एव्हाना तोडगा निघाला असता, असे वक्तव्य भाजप नेते सुशील मोदी (Sushil Modi) यांनी केले आहे. कृषी कायद्यांवरून चहुबाजूंनी घेरल्या गेलेल्या भाजपसाठी हा एकप्रकारे घरचा आहेर मानला जात आहे. (Farmers protest would not continued if Arun jaitley been alive says Sushil Modi)

सुशील मोदी यांनी सोमवारी अरूण जेटली यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मोदी यांनी म्हटले की, अरुण जेटली आज हयात असते तर शेतकरी ज्याप्रकारे समस्यांचा सामना करत आहेत, आंदोलन करत आहेत, ते इतक्या दीर्घकाळ सुरु राहिले नसते. अरूण जेटली यांनी त्यावर एव्हाना नक्कीच काहीतरी तोडगा काढला असता, असे सुशील मोदी यांनी म्हटले.

सुशील मोदी यांच्या या वक्तव्यामुळे भाजप कोंडीत सापडण्याची शक्यता आहे. कृषी कायदे मागे घेण्यासाठी सध्या दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे राजकीय विरोधकांनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले आहे. अशात सुशील मोदी यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळू शकते.

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये उद्या महत्त्वाची बैठक

नव्या कृषी कायद्यांसह अन्य मुद्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना बुधवारी दुपारी 2 वाजता बैठकीला बोलावले आहे. 40 शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून मंगळवारी बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यात तिन्ही नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या कार्यपद्धतीवर चर्चा आणि किमान आधारभूत मूल्याला (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याच्या अटीसह अन्य काही मुद्दय़ांचा समावेश होता.

मात्र, सरकार हमीभाव आणि कृषी कायदे मागे घेण्यास तयार नसल्याने ही बैठक निष्फळ ठरण्याचीच दाट शक्यता आहे. त्यामुळे तोडगा न निघाल्यास आंदोलनाची पुढील दिशा १ जानेवारी २०२१ रोजी जाहीर करण्यात येईल. त्यानंतरचे आंदोलन तीव्र असेल, असे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी! कांदा निर्यातीवरील बंदी उठवली, केंद्राचा मोठा निर्णय

शरद पवारांची केंद्र सरकारला डेडलाईन; शेतकरी आंदोलनावर तोडगा काढा नाही तर…

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आयुष्यातलं शेवटचं आंदोलन करेन; अण्णा हजारेंचा केंद्राला इशारा

(Farmers protest would not continued if Arun jaitley been alive says Sushil Modi)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.