AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हरियाणा जमीन प्रकरण: रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल, ED ची 18 तास चौकशी

काँग्रसेच्या खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचनालयाने ( ईडी ) वाड्रा यांच्या विरोधात हरियाणाच्या शिकोहपुरमध्ये जमीन खरेदी कराराशी जोडलेल्या मनी लॉड्रींग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे.या प्रकरणात वाड्रा यांच्यासह या प्रकरणात अनेक लोक आणि कंपन्यांची नावे सामील आहेत.

हरियाणा जमीन प्रकरण: रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल, ED ची 18 तास चौकशी
robert vadra
| Updated on: Jul 17, 2025 | 4:29 PM
Share

काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.सक्तवसुली संचनालयाने ( ईडी ) वाड्रा यांच्या विरोधात हरिणायातील शिकोहपूर येथील जमीन खरेदी करारप्रकरणात मनी लॉड्रींग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. वाड्रा यांच्यासोबत या प्रकरणात अनेक लोक आणि कंपन्यांच्या नावांचा समावेश केला आहे. हे प्रकरण सप्टेंबर २०१८ चे असून जेव्हा रॉबर्ट वाड्रा हरियाणाचे तत्कालिन मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ आणि एक प्रॉपर्टी डीलर यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाली होती. एफआयआरमध्ये भ्रष्टाचार,फसवणूक बनावटपणा यांसह अन्य आरोप ठेवले आहेत.

आरोपपत्रानुसार वाड्रा यांची कंपनी स्काईलाईट हॉस्पिटॅलिटीने २००८ मध्ये ७.५ कोटी रुपयांत ३.५३ एकरची जमीन खरेदी केली होती. तर योजना पूर्ण होण्याआधीच ही जमीन ५८ कोटींना विकली होती. आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रा यांना आरोपी केले आहे. या प्रकरणात ईडीने वाड्रा यांची १८ तासांहून अधिक वेळ चौकशी केली. याच सोबत हरियाणाच्या अन्य काँग्रेस नेत्यांचीही चौकशी झाली आहे. आरोपपत्रात त्यांच्या जबाबाचा उल्लेख आहे.

वाड्रांवर आरोप काय ?

वाड्रा यांच्यावर त्यांची कंपनी स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रा.लि.ने ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून ७.५ कोटी रुपयात ३.५ एकर जमीन खरेदी केली होती. हरियाणाचे तत्कालिन मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह यांच्या सरकारने जमिनीपैकी २.७० एकर जमीनीवर कर्मशियल कॉलनी उभारण्याची परवानगी देतानाच वाड्रा यांच्या कंपनीला परवाना दिला होता. गृहनिर्माण प्रकल्पाचे लायसन्स मिळाल्यानंतर या जमीनीची किंमत वाढली. नंतर वाड्रा यांच्याशी संबंधित कंपनीने ही जमीन डीएलएफ यांना ५८ कोटींना विकली.

नंतर डुड्डा सरकारने गृहनिर्माण प्रकल्पाचा परवाना डीएलएफला ट्रान्सफर केला. या संपूर्ण प्रकरणात अनेक अनियमित प्रकार झाले. हरियाणा पोलिसांनी २०१८ मध्ये या

आयएएस अशोक खेमका यांनी केला आरोप

रॉबर्ट वाड्रा यांच्यासंबंधित या प्रकरणातील गडबड झाल्याचा आरोप आयएएस अशोक खेमका यांनी केला.डिसेंबर २०२३ मध्ये ईडीने या प्रकरणात युएई स्थित व्यवसायी सीसी थंपी आणि ब्रिटनचे शस्रास्र डीलर संजय भंडारीचे नातेवाईक सुमित चढ्ढा यांच्या विरोधात चार्जशिट दाखल केली. चार्जशिटमध्ये वाड्रा आणि त्यांची पत्नी प्रियंका गांधी यांचे नाव आरोपी म्हणून नाही. परंतू त्यांच्या जमीन खरेदी आणि विक्रीचा तपशिल सामील आहे.

ईडीने म्हटले होते की वाड्रा यांच्याशी कथित स्वरुपात संबंधित थंपी यांनी २००५ ते २००८ दरम्यान, दिल्ली-एनसीआर येथील रिअल इस्टेट एजंट एचएल पहवा यांच्यामार्फत हरियाणाच्या फरीदाबाद येथील अमीरपूर गावात सुमारे ४८६ एकर जमीन खरेदी करण्यात आली. आरोपपत्रानुसार, रॉबर्ट वाड्रा यांनी २००५-२००६ मध्ये एचएल पहवा यांच्याकडून अमीरपूरमध्ये ३३४ कनाल (४०.०८ एकर) जमिनीचे तीन तुकडे खरेदी केले आणि डिसेंबर २०१० मध्ये तीच जमीन एचएल पहवा यांना विकली. ईडीच्या मते, रॉबर्ट वाड्रा यांच्या पत्नी प्रियांका गांधी वाड्रा यांनी एप्रिल २००६ मध्ये हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील अमीरपूर गावात ४० कनाल (०५ एकर) शेती जमीन एचएल पहवा यांच्याकडून खरेदी केली आणि फेब्रुवारी २०१० मध्ये तीच जमीन एचएल पहवा यांना विकली.

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.