AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरुषाने विवाहित असल्याचे सांगितल्यानंतरही शारीरिक संबंध ठेवणे बलात्कार नाही, न्यायालयाचा निर्णय

पुरुषाने विवाहित असल्याचे सांगितल्यानंतर त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवणे बलात्काराच्या कक्षेत येत नसल्याचा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

पुरुषाने विवाहित असल्याचे सांगितल्यानंतरही शारीरिक संबंध ठेवणे बलात्कार नाही, न्यायालयाचा निर्णय
विवाह बाह्य संबंध Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 09, 2022 | 7:54 PM
Share

तिरुअनंतपूरम, एका 33 वर्षीय व्यक्तीने लग्नाचे खोटे वचन (False promise of marriage) देऊन शारीरिक संबंध (Physical relationship)  प्रस्थापित केले त्यामुळे महिलेलने पुरुषावर बलात्काराचा आरोप करीत न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने या प्रकरणात निकाल पुरुषाच्या बाजूने देत त्याला निर्दोष मुक्त केले आहे. हे प्रकरण काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. केरळ उच्च न्यायालयात (High Court of Kerala)  एका पुरुषाविरुद्ध याचिका दाखल केली होती. हायकोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली तेव्हा अनेक पैलू समोर आले आणि त्यानंतर मोठा निर्णय देण्यात आला.

न्यायालयाचा पैलू

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान असे आढळून आले की, ज्या मुलीचे (फिर्यादी) त्या पुरुषाशी संबंध होते तिला त्या पुरुषाचे लग्न झाल्याचे आधीच माहित होते. दोघे 2010 पासून एकमेकांना ओळखत होते. तिला 2013 मध्ये मुलाच्या लग्नाची माहिती मिळाली, त्यानंतरही दोघांनी आपले संबंध सुरू ठेवले. दोघांचे नाते मुलाच्या लग्नापूर्वीचे होते, जे नंतरही कायम राहिले. मुलाने घटस्फोट घेतल्यानंतरही दोघांमधील संबंध कायम राहिले. या प्रकरणात मुलावर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन संबंध ठेवल्याचा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे तक्रारदाराने केलेल्या आरोपांचे खंडन केले.

हे तर प्रेम आणि रोमांच

यानंतर हायकोर्टानेही या दोघांमधील शारीरिक संबंधांवर भाष्य केले. केरळ हायकोर्टाने म्हटले आहे की, आरोपी आणि तक्रारदार यांच्यातील संबंध हे परस्पर संमतीने ठेवल्या गेले होते. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आरोपीने (मुलगा) मुलीशी लग्न करण्याचे वाचन दिल्याचे कुठेही समोर आलेले नाही. तसेच त्याने मुलीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचेही सिद्ध झाले नाही. अशा परिस्थितीत या काळात निर्माण झालेली नाती बलात्काराच्या कक्षेत ठेवता येत नाहीत, हे प्रेम आणि रोमांच याच्या परिघातले  असल्याचे न्यायालय म्हणाले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.