सुहागरात्रीसाठी दाम्पत्य रात्री रूममध्ये गेलं, सकाळी अख्ख कुटुंब हादरलं, शहरातील थरकाप उडवणारी घटना
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, सुहागरात्रीच्या दिवशीच दाम्पत्यासोबत भयानक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे कुटुंब देखील हादरलं आहे.

उत्तर प्रदेशच्या अयोध्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, अयोध्येमधील एका कुटुंबातील सदस्याचं नुकतंच लग्न झालं होतं. घरात नव्या नवरीच्या स्वागताची तयारी सुरू होती. नवरदेव देखील आपल्या नवरीला घेऊन घरी आला. सर्व विधी पार पडले. त्यानंतर सुहागरात्रीच्या दिवशी भयंकर प्रकार घडल्याचं समोर आलं आहे, या घटनेनंतर अजूनही या कुटुंबाला धक्क्यातून सावरता आलेलं नाहीये. ज्या घरात काही वेळेपूर्वी उत्साहाचं आनंदाच वातावरण होतं, ते वातावरण एका रात्रीतून होत्याचं नव्हतं झालं, कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं?
घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना सहादगंज मुरावनमधील आहे. या गावात राहणाऱ्या एका कुटुंबातील सदस्याचं लग्न झालं. सर्व जन खूप आनंदात होते. नव्या नवरीच्या स्वागताची कुटुंबाने जोरदार तयारी केली होती. मात्र सुहागरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हा आनंद मावळला, समोरचं दृश्य पाहून कुटुंब हादरलं. सर्वांच्या डोळ्यात फक्त अश्रूधारा होत्या. कुटुंब सुन्न झालं होतं.
सुहागरात्रीच्या दिवशी नवविवाहित दाम्पत्य आपल्या रूमध्ये गेलं. दुसऱ्या दिवशी सर्वजण ते बाहेर येण्याची वाट पाहू लागले. मात्र सकाळचे सात वाजले तरीदेखील कोणीच बाहेर न आल्यानं कुटुंबातील व्यक्तींनी त्यांना झोपेतून उठवण्यासाठी आवाज दिला. मात्र समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.मात्र खूप आवाज देऊन देखील प्रतिसाद मिळत नसल्यानं कुटुंबातील व्यक्तींनी घाबरून घराचा दरवाजा तोडला.
समोरचं दृश्य पाहून कुटुंब हादरलं
या कुटुंबातील सदस्यांनी जेव्हा दरवाजा तोडला, तेव्हा समोरचं दृश्य पाहून कुटुंब हादरलं.नवऱ्यानं घराच्या छताला ओडनीच्या मदतीनं फाशी घेतली होती. तर नवरी देखील बेडवर मृत अवस्थेमध्ये आढळून आली आहे. तातडीनं डॉक्टरांना बोलावण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी देघांना तपासून मृत घोषीत केलं. घटनेबाबत अधिक तपास सुरू असून, त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याचं कारण अजून स्पष्ट नसल्याची माहिती या प्रकरणात पोलिसांनी दिली आहे. आता या दोघांनी आत्महत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत.
