AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrayaan 3 Latest News: चांद्रयान-3 प्रक्षेपण कसं आणि कुठे पाहता येणार?

भारताची ही तिसरी चांद्रयान मोहीम आहे. 2019 साली चांद्रयान 2 मोहिमेत भारताला लँडर आणि रोव्हरच्या सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आले होते. आज 14 जुलैच्या प्रक्षेपणानंतर या चांद्रयानाचं 23 किंवा 24 ऑगस्टला लँडिंग अपेक्षित आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा चौथा देश आहे.

Chandrayaan 3 Latest News: चांद्रयान-3 प्रक्षेपण कसं आणि कुठे पाहता येणार?
Chandrayaan 3 live
| Updated on: Jul 14, 2023 | 3:07 PM
Share

नवी दिल्ली: चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाची आतुरतेने वाट पाहिली जातीये. भारत चांद्रयान-3  प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 चे प्रक्षेपण होईल. भारताची ही तिसरी चांद्रयान मोहीम आहे. 2019 साली चांद्रयान 2 मोहिमेत भारताला लँडर आणि रोव्हरच्या सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आले होते. आज 14 जुलैच्या प्रक्षेपणानंतर या चांद्रयानाचं 23 किंवा 24 ऑगस्टला लँडिंग अपेक्षित आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा चौथा देश आहे. अमेरिका रशिया आणि चीन हे देश याआधी चंद्रावर उतरलेले आहेत. आपला देश चौथा आहे.

चंद्राचे भूगर्भशास्त्र, तिथल्या पर्यावरणाचा अभ्यास हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. श्रीहरिकोटा मधील सतीश धवन अंतराळ केंद्रातील दुसऱ्या लाँच पॅडवरून चांद्रयान-3 चे LMV-3 च्या द्वारे चंद्रावर प्रक्षेपण केले जाईल. हे यान 14 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आपल्या चांद्रप्रवासाला सुरुवात करेल. हे चांद्रयान पृथ्वीपासून सुमारे 3,84,000 किलोमीटर दूर जाईल.

चांद्रयान-3 चे प्रक्षेपण कसे पाहावे?

आजचं प्रक्षेपण पाहण्यासाठी इस्रोकडून अनेक शाळांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. देशातील विविध ठिकाणाहून चांद्रयान ३ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी लोकांनी हजेरी लावलीये. तुम्ही सुद्धा हे प्रक्षेपण कुठूनही पाहू शकता.

Chandrayaan 3 Moon Landing LIVE Tracking 

आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी हे प्रक्षेपण होईल. चांद्रयान-3 मोहिमेचे थेट प्रक्षेपण इस्रोच्या वेबसाईटवर जाऊन https://www.isro.gov.in किंवा त्यांच्या युट्यूब चॅनलवर देखील पाहण्यात येणार आहे. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलैला झाल्यास ऑगस्टच्या अखेरीस चंद्रावर पोहोचण्याची शक्यता आहे. हे यान 45 ते 48 दिवसांचा कालावधी घेऊन 23 किंवा 24ऑगस्टपर्यंत चंद्रावर पोहोचू शकते.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.