दृश्यमपेक्षाही भयंकर हत्याकांड, आधी बायकोला मारलं, शेतातच गाडून कबरीवर…, या गोष्टीमुळे झाला उलगडा
वयाच्या 59 वर्षी बायकोची हत्या, दृश्यमपेक्षाही भयंकर हत्याकांड, बायकोचा जीव घेतला, त्यानंतर बायकोचं मृतदेह शेतात गाडलं आणि.... हैराण करणारा हत्याकांड समोर...

रागात असलेल्या व्यक्ती काय करुन बसेल काहीही सांगता येत नाही. आता देखील असंच काही झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षीय नवऱ्याने आधी बायकोची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्याच शेतात मृतदेह पुरला आणि त्यावर शेती केली. या महाभयंकर हत्याकांडामुळे सर्वत्र खळबळ माजरी आहे. सध्या सर्वत्र प्रकरणाची चर्चा सुरु आहे. सांगायचं झालं तर, संबंधित घटना मध्यप्रदेशातील रीवा येथील आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, जवळपास 9 महिन्यांनंतर प्रकरण समोर आलं आहे.
एका व्यक्तीने बायकोला कीटकनाशक पाजून मारलं आणि नंतर त्याच्या शेतात कबर खोदून मृतदेह पुरला. एवढंच नाही तर सर्व पुरावे मिटवण्यासाठी त्याने ट्रॅक्टरने शेतात पिकवलेल्या भाज्या उपटून टाकल्या आणि कबरीवर ढीग करून पळून गेला. अखेर पोलिसांनी आरोपीला प्रयागराज येथून अटक केली आहे.
रिवा जिल्ह्यात रामवती मांझी या पती देवमुनी मांझी आणि मुलीसोबत राहात होत्या. देवमुनी भाज्यांची शेती करत होता. ज्यामध्ये देवमुनी याला बायको आणि मुलीची देखील मदत मिळत होती. 11 ऑक्टोबर 2024 मध्ये रामवती हिचा मुलगा अभिलाष देशात आला तेव्हा त्याला आई भेटली नाही. त्यामुळे त्याने आई कुठे आहे… असं बहिणीला विचारलं. तेव्हा आई प्रयागराज येथे गेल्याचं तिने सांगितलं.
पण रामवती कुठेच भेटल्या नाहीत, अखेर सर्वत्र शोधल्यानंतर चिंतेत असलेल्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केला. त्यानंतर पोलिसांना रामवती हिची हत्या झाल्याची माहिती तपासात समोर आली. पोलिसांनी शोध घेतला आणि कबरीतून मृतदेह बाहेर काढला आणि चौकशी सुरु केली. एसडीओपी उदित मिश्रा म्हणाले की, पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरु केल्यापासून आरोपी मांझी त्याच्या मुलीसह फरार होता.
अखेर पोलिसांनी देवमुनी याच्यावर 20 हजार रुपयांचं बक्षीस ठेवलं. अखेर देवमुनी मांझीला उत्तर प्रदेशातील घुरपूर जिल्हा प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपीला प्रयागराज येथून अटक केली आणि न्यायालयात हजर केले. जिथून त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं. पोलिसांनी घटनेत वापरलेला ट्रॅक्टर देखील जप्त केला आहे.
