AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे पहिल्यांदा घडतंय, हैदराबादच्या मशिदीत महिलांसाठी जीम!

राजेंद्रनगर येथील एका मशिदीने जवळपासच्या परिसरांतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी व्यायामशाळा अर्थात जीम आणि ‘वेलनेस सेंटर’ सुरु केले आहे.

हे पहिल्यांदा घडतंय, हैदराबादच्या मशिदीत महिलांसाठी जीम!
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jan 22, 2021 | 10:47 AM
Share

हैदराबाद : राजेंद्रनगर येथील एका मशिदीने जवळपासच्या परिसरांतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी व्यायामशाळा अर्थात जीम आणि ‘वेलनेस सेंटर’ सुरु केले आहे. हैदराबादमध्ये पहिल्यांदाच असे आहे की, एखाद्या मशिदीने तज्ज्ञ प्रशिक्षक असलेली, महिलांसाठीची व्यायामशाळा सुरु केली आहे. या झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांच्या आरोग्यासंबंधित समस्या आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे, हे या जीम आणि वेलनेस सेंटरचे उद्दिष्ट आहे (Hyderabad mosque opens a gym and wellness center for womens).

महिलांना शारीरिक व्यायामाकरिता दररोज दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी व्यावसायिक महिला प्रशिक्षकाची नेमणूक केली गेली आहे. या सेंटरमध्ये आरोग्य सल्लागार आणि एक डॉक्टर देखील आहेत.

राजेंद्रनगरमधील वादी-ए-महमूद येथे असलेल्या मशिदी-ए-मुस्तफा येथील व्यायामशाळाला अमेरिकेतील ‘SEED’ या अमेरिकेतील स्वयंसेवी संस्थेने अर्थसहाय्य दिले आहे. हेल्पिंग हँड फाउंडेशन (एचएचएफ) ही शहरी स्वयंसेवी संस्था मशिद समितीशी समन्वय साधून हे वेलनेस सेंटर चालवत आहे.

महिलांच्या आहारावर लक्ष केंद्रित

या जीमतर्फे ओल्ड सिटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार असे दिसून आले आहे की, सुमारे 52% महिलांना कार्डिओमॅटाबोलिक सिंड्रोमचा धोका आहे.

या सर्वेक्षणात, मुख्यत्वे 25 वर्षांपेक्षा जास्त वय स्त्रिया, ज्यांचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) असणार्‍या आणि इतर रोगांचा जास्त धोका असणार्‍या महिलांची या जीममध्ये प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. ‘मशिद क्लिनिक-कम-जीम’मधील एनसीडी प्रोग्रामचे मुख्य उद्दिष्ट आरोग्य मूल्यांकन, आहार, व्यायामाबद्दल सल्लामसलत आणि मुत्रपिंड, यकृत, डोळ्याच्या समस्येसाठी तपासणी हे असणार आहे. यासाठी इथे प्रशिक्षित आणि व्यावसायिक सल्लागार नेमण्यात आले आहेत, असे एचएचएफचे व्यवस्थापकीय विश्वस्त मुजताबा हसन अस्करी यांनी सांगितले (Hyderabad mosque opens a gym and wellness center for womens).

25 ते 55 वर्षे वयोगटातील महिलांचे सर्वेक्षण

या सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की, इथल्या सुमारे 30% महिलांमध्ये पीसीओडीची समस्या आहे. एका सर्वेक्षणादरम्यान 25 ते 55 वर्षे वयोगटातील महिलांचे परीक्षण केले गेले. यात सुमारे 12% महिलांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि थायरॉईड समस्या होत्या. तसेच सर्व महिलांमध्ये बीएमआय 25 पेक्षा जास्त होता.

मुजतबा म्हणाल्या की, 52% महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण 0.8 पेक्षा जास्त आहे, ज्यामुळे महिलांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी सिंड्रोम होण्याचा धोका संभवतो. ज्याला आता इंसुलिन प्रतिरोध, टोलेरेंस आणि डी-एरेन्टेड लिपिड्स यासारख्या समस्यांमध्ये वर्गीकृत केले गेले आहे. या समस्यांमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका संभवतो.

(Hyderabad mosque opens a gym and wellness center for womens)

हेही वाचा :

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.