AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गेट आऊट’, या IAS अधिकाऱ्याने थेट नेत्यांनाच सुनावले, मग मागवला पोलिसांचा फौजफाटा, पुढे झाले काय? Video Viral

IAS Officer Gautam Ustav : आयएएस अधिकाऱ्यांना कधी कधी जनतेचा सूर कळत नाही आणि नाडी हाती लागत नाही असं म्हटल्या जाते. याचा प्रत्यय या आयएएस अधिकाऱ्याला आला. त्यावरून मोठा राडा झाला. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

'गेट आऊट', या IAS अधिकाऱ्याने थेट नेत्यांनाच सुनावले, मग मागवला पोलिसांचा फौजफाटा, पुढे झाले काय? Video Viral
उत्सव गौतम
| Updated on: Oct 12, 2025 | 4:05 PM
Share

आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्याच्या डोक्यात खुर्चीची हवा गेली तर कधी कधी मोठा तमाशा होतो. या अधिकाऱ्यांच्या अंहकारामुळे मोठे नाट्य घडते. आयएएस अधिकाऱ्यांना कधी कधी जनतेचा सूर कळत नाही आणि नाडी हाती लागत नाही असं म्हटल्या जाते. याचा प्रत्यय गुजरातमध्ये नियुक्ती झालेल्या या आयएएस अधिकाऱ्याला आला. त्याच्या एका कृतीवरून मोठा राडा झाला. थेट पोलिसांनाच पाचरण करावे लागले. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

गुजरातमधील कच्छ हा सीमावर्ती आणि राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. येथे आयएएस उत्सव गौतम यांच्यावर डीडीओची मोठी जबाबदारी आहे. उत्सव यांचा अतिउत्साह त्यांच्या चांगलाच अंगलट आल्याचे समोर आले. मांडवी तहसील अंतर्गत एक लोकप्रतिनिधी भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहचले. पण आयएएस उत्सव गौतम यांनी त्यांना थेट ‘गेट आउट’ म्हटले.

कोणतेही सबळ कारण न देता अशा प्रकारे अपमान केल्याने या नेताजीचा जीव खजील झाला. हाहा म्हणता म्हणता ही बाब तालुक्यात पसरली. मग काय त्यांचे कार्यकर्ते, चाहत्यांनी डीडीसी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरु केले. जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. माणसांची कुमक काही केल्या कमी होईना. संध्याकाळ होत आल्यावर आयएएस उत्सव गौतम यांना कार्यालयाबाहेर पडण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा मागवावा लागला. याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांनी त्यांना माणुसकीचे धडे शिकवणे गरजेचे असल्याचा सल्ला दिला.

कोण आहेत आयएएस उत्सव गौतम?

गौतम उत्सव 2018 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्यांची जिल्हा विकास अधिकारी म्हणून खास नियुक्ती करण्यात आली आहे. ते मुळचे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवाशी आहे.आयआयटी पाटणा येथून त्यांनी बीटेक केलेले आहे. युपीएससी परीक्षेत ते 33 व्या रँकवर होते. त्यांची जिल्हा विकास अधिकारी म्हणून फेब्रुवारी 2025 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी ते अमरेली जिल्ह्यात होते. ते चौथ्या प्रयत्नात प्रशासकीय अधिकारी झाले. त्यांनी बीटेकनंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी केली. पण ती सोडून प्रशासकीय सेवेत आले. पण कच्छमधील त्यांच्या वर्तनावर स्थानिक नाराज झाले आहेत.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.