AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, दिवसभरात तब्बल ‘इतके’ हजार रुग्ण, पुण्यात एकाचा मृत्यू

देशात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची धाकधूक वाढली आहे. आरोग्य विभागाकडून आता काळजी घेतली आहे. पण देशात आज दिवसभरातील आढळलेल्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल 4 हजारांपेक्षा जास्त आहे.

देशात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, दिवसभरात तब्बल 'इतके' हजार रुग्ण, पुण्यात एकाचा मृत्यू
Image Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Apr 05, 2023 | 11:07 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना संकटाने आपल्यापासून अनेक जवळची माणसं हिरावली. अनेक संसार उद्ध्वस्त झाले. अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक जण देशोधडीला लागले. अनेकांना आपल्या जवळच्या माणसाला शेवटच्या क्षणी पाहताही आलं नाही. कोरोना संकटाच्यावेळी एक काळ असा होता की, अंत्यविधीसाठी मृतदेहांची स्मशानभूमी परिसरात रांग लागलेली असायची, देशातल्या स्मशानभूमी कमी पडत होत्या. इतकं भयानक ते वास्तव आहे. या संकटाचं स्मरण जरी झालं तरी अंगावर शहारे येतात. नको असलेली भयानक भीती मनात येऊन जाते. गेल्या तीन वर्षांपासून हे संकट देशात आहे. गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती निवळली होती. पण आता पुन्हा कोरोना संकट गडद होताना दिसत आहे. विशेष म्हणजे देशातली आजची नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही चिंताजनक आहे.

भारतात पुन्हा नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. देशात आज दिवसभरात तब्बल 4 हजार 435 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. देशात सध्या एकूण 23 हजार सक्रीय रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईत दिवसभरात 221 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दिवसभरात 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या 1 हजार 244 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत दररोज 200 पेशा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.

पुणे जिल्ह्यात दिवसभरात 98 कोरोना रुग्णसंख्येची नोंद झालीय. कोरोनामुळे दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झालाय. पुणे मनपा हद्दीत 63 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. जिल्ह्यात अजूनही 756 सक्रीय रुग्णसंख्या असल्याची माहिती मिळत आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.