Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील सर्वात आलिशान ट्रेन, 5 स्टार हॉटेल्ससारख्या सुविधा, जाणून घ्या किती आहे भाडे

भारतातील बहुतेक लोकांना ट्रेनने प्रवास करायला आवडते. बजेट फ्रेंडली असण्याव्यतिरिक्त हा एक आरामदायक प्रवास देखील मानला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की भारतात अशा काही आलिशान ट्रेन आहेत ज्यात प्रवास करण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च करावे लागतील. चला त्या ट्रेनबद्दल जाणून घेऊयात...

भारतातील सर्वात आलिशान ट्रेन, 5 स्टार हॉटेल्ससारख्या सुविधा, जाणून घ्या किती आहे भाडे
Follow us
| Updated on: Feb 16, 2025 | 1:58 PM

दरवर्षी लाखो पर्यटक भारतात असणारे धर्मिक स्थळे, भारतीय संस्कृती तसेच नामाकिंत ठिकाणं व पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येत असतात. तेव्हा अनेक ठिकाणं फिरण्यासाठी खास करून लोकं ट्रेनचा प्रवास करतात. कारण ट्रेनचा प्रवास हा खूप आरामदायी आणि प्रत्येकाच्या बजेटनुसार अनुकूल असतो. पण भारतातील अशा काही ट्रेन आहेत ज्यातून प्रवास करताना तुम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये बसलो आहे की काय अशी आठवण येते. यात या ट्रेनचा प्रवास विमान प्रवासापेक्षा देखील खूप महाग आहे.

तुम्हाला देखील ट्रेनने प्रवास करायची आवड असेल तर तुम्ही मोठ्या उत्साहाने भारतभर प्रवास करू शकतात. अशातच तुमचं जर स्वप्न असेल की ट्रेनचा प्रवास एकदम राजेशाही आणि महाराजांसारखा व्हावा तर भारतातील या आलिशान ट्रेन्स तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतात. या ट्रेन बद्दल जाणून घेऊयात ज्या मध्ये बसण्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतील. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या ट्रेन्सचे भाडे लाखो रुपये आहे. पण तुम्ही या ट्रेनने प्रवास केला की, हा अनुभव तुम्ही आयुष्यभर कधीही विसरणार नाही.

महाराजा एक्सप्रेस

महाराजा एक्सप्रेस ही एक अतिशय आलिशान ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये २३ कॅरीज-लॉन्ग ट्रेन हाउस आहे. या ट्रेनमध्ये जुनिया सुइट केबिन, डिलक्स केबिन, सुइट्स आणि प्रेसिडेंशियल सुइट्स सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. जर तुम्हाला आरामदायी प्रवास करायचा असेल तर या ट्रेनने आवर्जून एकदा तरी नक्की प्रवास करा. या ट्रेनचा ७ दिवसांच्या प्रवासासाठी तुम्हाला सुमारे २१ लाख रुपये खर्च करावे लागतील.

रॉयस ओरिएंट ट्रेन

या ट्रेनमध्ये राजस्थान आणि गुजरातमधील काही खास पर्यटन स्थळांचा समावेश आहे. त्यात केबिन, वॉटरिंग होल, लायब्ररी आणि रेस्टॉरंटचा समावेश आहे. ही ट्रेन एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखी बनवण्यात आली आहे. ही ट्रेन दिल्ली, चित्तोडगड, उदयपूर, जुनागढ, भिलवाडा, सरखेज, अहमदाबाद, जयपूर मार्गे दिल्लीला तुम्हाला पोहचवते. यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला 7 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो.

पॅलेस ऑन व्हील्स

तुम्हाला जर राजस्थानची रॉयल्टी अनुभवायची असेल तर पॅलेस ऑन व्हील्स ट्रेनमध्ये चढा. ही ट्रेन एखाद्या राजवाड्यासारखी आहे, आलिशान सुट, भरगच्च जेवणाचा आस्वाद घेता येईल आणि महाराजासारखी सेवा. प्रवाशांसाठी आलिशान केबिन, स्टॉक बार, स्पा आणि लायब्ररीची व्यवस्था देखील या ट्रेनमध्ये करण्यात आली आहे. या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये खर्च करावे लागतील.

संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'.
राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी
राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी.
मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल
मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल.
फडणवीसांची पहिल्यांदाच नितेश राणेंना तंबी, 'त्या' विधानावरून फटकारलं
फडणवीसांची पहिल्यांदाच नितेश राणेंना तंबी, 'त्या' विधानावरून फटकारलं.
'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल
'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल.
खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं
खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं.
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप.
नागपुरातील राड्यानंतर शिंदेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं
नागपुरातील राड्यानंतर शिंदेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं.
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार.