AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानची झोप उडणार, राफेल विमान अधिक घातक, भारत बसवणार ही नवीन प्रणाली

Rafale Fighter Jet: भारताने इस्त्रायलला X Guard फायबर ऑप्टिक टोन्ड डेकॉय सिस्टमची ऑर्डर दिली आहे. ही प्रणाली राफेल विमानांची ताकद वाढवणार आहे. यामुळे पाकिस्तानची झोप उडणार आहे.

पाकिस्तानची झोप उडणार, राफेल विमान अधिक घातक, भारत बसवणार ही नवीन प्रणाली
rafale fighter jet
| Updated on: Jul 12, 2025 | 12:45 PM
Share

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानकडून भारताचे राफेल विमान पाडल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानचा हा दावा भारताने वारंवार फेटाळून लावला आहे. तसेच पाकिस्तानकडूनही विमान पाडल्याचा एकही पुरावा दिला नाही. राफेल बनवणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीनेही पाकिस्तानचा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तानची झोप उडवणारी बातमी आली आहे. भारताने आपल्या लढाऊ विमानांची सुरक्षा आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला इस्त्रायलकडून ‘डेकॉय सिस्टम’ मिळवणार आहे. यामुळे राफेल विमानाची ताकद वाढणार असून शत्रूच्या भागामध्ये हे विमान सुरक्षित असणार आहे.

शत्रूच्या भागात विमान राहणार सुरक्षित

‘डेकॉय सिस्टम’ राफेल विमानांना शत्रूच्या क्षेपणास्त्रांपासून संरक्षण देईल. भारताने इस्त्रायलला X Guard फायबर ऑप्टिक टोन्ड डेकॉय सिस्टमची ऑर्डर दिली आहे.  ही प्रणाली राफेल विमानांची ताकद वाढवेल आणि शत्रूच्या क्षेत्रातही त्यांना सुरक्षित ठेवणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डेकॉय सिस्टम’ राफेल विमानांना लावून त्याची चाचणीही करण्यात आली आहे. भारत सरकार आता लवकरात लवकर ही प्रणाली मिळवण्याच्या तयारीला लागले आहे. ही प्रणाली राफेल विमानांना शत्रूंच्या क्षेपणास्त्रापासून वाचवणार आहे.

वारंवार वापरता येणारी प्रणाली

इस्त्रायलच्या हवाई दलाकडून डेकॉय सिस्टमचा वापर केला जातो. ही प्राणाली वारंवार वापरता येते. तिला लढाऊ विमानांच्या इलेक्ट्रॉनिक वारफेयर सिस्टमसोबत जोडलेले असते. ही प्रणाली शत्रूच्या क्षेपणास्त्राची फसवणूक करण्याचे काम करते. ही प्रणाली एका पॉडमध्ये लावलेली असते. मिशन दरम्यान त्याचा वापर केला जातो. फायबर ऑप्टिक लाइनच्या माध्यमातून ही प्रणाली विमानाला जोडलेली असते. जेव्हा शूत्र क्षेपणास्त्राने विमानावर हल्ला करतो, तेव्हा ही सिस्टीम त्याला आपल्याकडे ओढून घेते. क्षेपणास्त्र त्या सिस्टीमला विमान समजून हल्ला करतो. त्यामुळे विमानाला काहीच होत नाही.

ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी राफेल विमानांनी पाकिस्तानच्या ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी हवाई तळांवर भारताने हल्ले केले. हे क्षेपणास्त्र हल्ले करण्यासाठीही भारताने राफेल विमानांचा वापर केला होता.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.