AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonia Gandhi : सोनिया गांधींच्या नाकातून रक्त येत होतं! कोरोना संसर्गानंतर काय झालं? जयराम रमेश यांनी दिलं हेल्थ अपडेट

जयराम रमेश यांनी सांगितले, की सोनिया गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर 12 जून रोजी त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले होते. त्यानंतर त्यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Sonia Gandhi : सोनिया गांधींच्या नाकातून रक्त येत होतं! कोरोना संसर्गानंतर काय झालं? जयराम रमेश यांनी दिलं हेल्थ अपडेट
सोनिया गांधी आणि राहुल गांधी (संपादित छायाचित्र)Image Credit source: tv9
| Updated on: Jun 17, 2022 | 1:27 PM
Share

नवी दिल्ली : सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना नाकातून रक्त येत होते, अशी माहिती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली आहे. एक पत्रक प्रसिद्ध करत त्यांनी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स दिले आहेत. सोनिया गांधी यांना नुकताच कोरोना झाला होता. आता सोनिया गांधींची तब्येत कशी आहे, याविषयी काँग्रेसने हेल्थ अपडेट (Health Update) दिले आहेत. यामध्ये काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले, की 12 जून रोजी सोनिया गांधी यांच्या नाकातून रक्त येत होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या सोनिया गांधी रुग्णालयातच आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या वतीने सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी देत हेल्थ अपडेट जारी केले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांची ईडीचौकशीही यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

‘कोरोनासह इतरही काही समस्या’

जयराम रमेश यांनी सांगितले, की सोनिया गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर 12 जून रोजी त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले होते. त्यानंतर त्यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. जयराम रमेश यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधींवर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू झाले. काल त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. नंतर त्यांच्या खालच्या श्वसनमार्गामध्ये बुरशीजन्य संसर्ग झाल्याचे आढळून आले. जयराम यांनी म्हटले आहे, की सोनिया गांधींवर सध्या उपचार सुरू आहेत, त्यांना कोविडनंतर आणखीही काही समस्या आहेत. सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

congress_4 1

जयराम रमेश यांनी जारी केले सोनिया गांधींचे हेल्थ अपडेट

राहुल गांधींची ईडीची चौकशी ढकलली पुढे

सोनिया गांधी 12 जूनपासून कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्या आजारी असल्यामुळे ईडीकडे चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही, अशी विनंती राहुल गांधी यांनी केली होती. ईडीने ती मान्य केली. त्यानंतर राहुल गांधी मध्यरात्रीच सर गंगाराम रुग्णालयमध्ये आपली आई सोनिया गांधी यांना जाऊन भेटले. दरम्यान, गुरूवारीही राहुल गांधी यांची ईडी चौकशी करण्यात आली, त्यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या आईच्या प्रकृतीचे कारण देत नॅशनल हेराल्ड प्रकरणी सुरू असलेली चौकशी 17 जून ते 20 जून या कालावधीत पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....