Jyoti Malhotra : 20 हजारांचा जॉब पण घर… ज्योती मल्होत्राने किती पैशांत विकलं ईमान ?
ज्योती मल्होत्राने तिच्या करिअरची सुरुवात फक्त 20 हजार रुपयांच्या नोकरीने केली. ट्रॅव्हल विथ जो या ज्योतीच्या यूट्यूब चॅनलचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत आणि ती नियमितपणे पाकिस्तानसह जगभर प्रवास करते.

भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेली ज्योति मल्होत्रा आणि इतर काही हेर सध्या चांगलेच चर्चेत आहे. हरियाणाच्या हिसारमध्ये राहणाऱ्या ज्योतील गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. ज्योतीने तिच्या करिअरची सुरुवात फक्त 20 हजार रुपयांच्या नोकरीने केली. ज्योतीला दरमहा 20 हजार रुपये पगार मिळत असे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती हरियाणातील हिसार येथील न्यू अग्रसेन भवन कॉलनीमध्ये 55 यार्डांच्या घरात राहत होती.
पण या नोकरीत मिळणाऱ्या 20 हजार रुपयांनी ज्योतीची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत, तेव्हा पैसे कमवण्यासाठी YouTube हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तिला एक चांगला पर्याय वाटला. हळूहळू तिला ग्लॅमर मिळू लागले आणि त्यासोबतच तिचं चांगलं उत्पन्नही होऊ लागलं. पण नंतर तिने पाकिस्तानसाठी हेरगिरी देखील करायला सुरुवात केली. ती किती आलिशान जीवन जगत होती हे ज्योतीच्या अटकेनंतर समोर आलं आहे.
Travel with Jo चे लाखो सबस्क्रायबर्स




ज्योतीच्या Travel with Jo या यूट्यूब चॅनलचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत आणि ती नियमितपणे पाकिस्तानसह जगभर प्रवास करते. तिची कमाईदेखील लाखोंमध्ये होती. यूट्यूबच्या माध्यमातून ती जाहिराती, ब्रँड प्रमोशन आणि स्पॉन्सरशिपद्वारेही चांगली कमाई करत असे.
83 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतची कमाई
जर आपण YouTube च्या मार्गदर्शक तत्त्वांवर नजर टाकली तर, या प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओला प्रत्येक 100 व्ह्यूजसाठी सुमारे 166 ते 996 रुपये मिळतात. ज्योतीच्या व्हिडिओंना सहज 50 हजार व्ह्यूज मिळत होते, म्हणून ती एका महिन्यात सुमारे 10 व्हिडिओ अपलोड करायची. त्यामुळे ज्योतीची कमाई सहजपणे 83 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत असेल.
ब्रँड डीलसाठी आकारायची ‘इतकी’ रक्कम
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्योतीची अंदाजे एकूण संपत्ती 15 लाख ते 40 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. पण तिची एकूण संपत्ती 15 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ज्योती एका डीलसाठी 20 हजार ते 50 हजार रुपये आकारत असे. एवढंच नव्हे तर ज्योती दरमहा 4 ते 5 ब्रँडशी व्यवहार करत करायची, त्यामुळे ती दरमहा 50 हजार ते 2 लाख रुपये सहज कमवू शकायची.