विद्यार्थी नेत्या ते देशाच्या परराष्ट्र मंत्री, सुषमा स्वराज यांची धगधगती कारकीर्द

विद्यार्थी नेत्या ते देशाच्या परराष्ट्र मंत्री, सुषमा स्वराज यांची धगधगती कारकीर्द

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचा मंगळवारी (6 जुलै 2019) रात्री अकराच्या सुमारास दु:खद निधन झालं. सुषमा स्वराज यांच्या अचानक मृत्यूने अनेकांना धक्का बसला असून अनेकांचा यावर विश्वासही बसत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Aug 07, 2019 | 10:53 AM

नवी दिल्ली : देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचा मंगळवारी (6 जुलै 2019) रात्री अकराच्या सुमारास दु:खद निधन झालं. सुषमा स्वराज यांच्या अचानक मृत्यूने अनेकांना धक्का बसला असून अनेकांचा यावर विश्वासही बसत नसल्याचे पाहायला मिळत आहे. स्वराज छातीत दुखायला लागल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालावली.

(2 वर्षांच्या सुषमा स्वराज आपल्या मोठ्या भावासोबत)

सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1953 मध्ये हरियाणातील अंबाला छावणीत झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव हरदेव शर्मा आणि आईचे नाव श्रीमती लक्ष्मी बाई असं होतं. स्वराज यांचे वडिल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. त्यांचं मुळ पाकिस्तानमधील लाहोर येथील होते. सुषमा स्वराज यांचे सुरुवातीचं शिक्षण अंबाला छावणीतील सनातन धर्म महाविद्यालयात झालं. तेथून त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्रात पद्वीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी चंदीगढ येथील पंजाब विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. हरियाणाच्या भाषा विभागाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सलग 3 वर्षे सर्वोत्कृष्ट वक्त्या होत्या.

(सुषमा स्वराज आणि त्यांचे पती सुषमा कौशल यांच्या लग्नाच्यावेळचे छायाचित्र)

सुषमा स्वराज यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून झाली. तर त्यांची राजकीय कारकीर्द 1970 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली. सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत चांगले संबंध होते. त्यामुळे 1975 पासून त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या कायदेशीर पथकाचं काम करायलाही सुरुवात केली. त्यांनी आपल्या तारुण्यावस्थेत थोर स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक जे. पी. नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनातही सक्रिय सहभाग घेतला होता.

(जे. पी. नारायण यांच्यासोबत त्यांच्या पाटणा येथील घरात सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल)

दरम्यान, देशात आणीबाणी लावण्यात आली. आणीबाणीनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अल्पावधीतच त्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या म्हणून पुढे आल्या. सुषमा स्वराज या 1977 ते 1982 या काळात हरियाणा विधानसभेत आमदार होत्या. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी अंबाला कँटोनमेंट या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर त्या पुन्हा एकदा 1987 ते 1990 या काळात विधानसभेवर निवडून गेल्या.

(जुलै 1977 मध्ये देवी लाल यांच्या सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेताना सुषमा स्वराज)

1977 साली जुलैमध्ये देवी लाल यांच्या सरकारमध्ये सुषमा स्वराज यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली. 1979 मध्ये त्यांच्यावर हरियाणाच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, जेव्हा त्यांचं वय केवळ 27 वर्षे होतं. हरियाणामध्ये त्यांनी शिक्षण मंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं.

(11 जून 1996 रोजी लोकसभेत विश्वासमताला विरोध करताना सुषमा स्वराज)

सुषमा स्वराज केंद्रात आल्यानंतर सुषमा स्वराज या त्यांच्या झटपट कामासाठी ओळखल्या जाऊ लागल्या. परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सभेतील भाषण असो, किंवा पासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेत सुरळीतता आणणं असो. सुषमा स्वराज यांनी आतापर्यंत अनेकांना फक्त एका ट्वीटवर मदत केली आहे.

(पार्लिमेंट गेटवर पती स्वराज कौशल यांच्यासोबत सुषमा स्वराज)

सुषमा स्वराज यांची संपूर्ण कारकीर्द (14 फेब्रुवारी 1952 ते 6 ऑगस्ट 2019)

2014 ते 2019 – परराष्ट्र मंत्री

मे 2014 ते जानेवारी 2016 – प्रवासी भारतीय कार्यमंत्री

2009 ते 2014 – लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या

जानेवारी 2003 ते मे 2004 – संसदीय कामकाज मंत्री

जानेवारी 2003 ते मे 2004 – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 – माहिती व प्रसारण मंत्री

ऑक्टोबर 1998 ते डिसेंबर 1998 – दिल्लीच्या मुख्यमंत्री

मे 2009 ते मे 2019 – खासदार (विदिशा लोकसभा मतदारसंघ)

मे 1996 ते ऑक्टोबर 1999 – खासदार (दक्षिण दिल्ली)


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें