ज्योतिरादित्य शिंदेंच्या बॅनरवर मोदी-शाहांचा फोटो

जम्मू काश्मीरमधून कलम 370 काढल्याप्रकरणी ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia poster) यांनी समर्थन दिलं होतं, त्याचसाठी हे पोस्टर लावण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

ज्योतिरादित्य शिंदेंच्या बॅनरवर मोदी-शाहांचा फोटो

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात काँग्रेसचं एक पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. कारण, काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पोस्टरवर (Jyotiraditya Scindia poster) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो दिसून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जम्मू काश्मीरमधून कलम 370 काढल्याप्रकरणी ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia poster) यांनी समर्थन दिलं होतं, त्याचसाठी हे पोस्टर लावण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

भाजपचे मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्याच्या समन्वयकांनी हे पोस्टर लावलं आहे. यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी अनेकदा काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज असल्याचंही ते नुकतंच म्हणाले होते. एकीकडे काँग्रेसने कलम 370 काढण्याचा विरोध केला होता, तर ज्योतिरादित्य शिंदे यांनी जाहीरपणे समर्थन केलं होतं.

मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरुन सध्या जोरदार ओढाताण सुरु आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील गटबाजी अनेकदा समोर आली. लोकसभा निवडणुकीत कमलनाथ यांच्या मुलाने विजय मिळवला. हा अपवाद वगळता काँग्रेसला मध्य प्रदेशात एकही जागा जिंकता आली नाही. विशेष म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे यांचाही पराभव झाला होता.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या महाराष्ट्रात 12 सभा

ग्वालियरचं शिंदे घराणं आणि महाराष्ट्राचं ऐतिहासिक नातं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेसाठी ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसचे स्टार प्रचारकांपैकी एक आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या महाराष्ट्रात 12 सभा होणार आहेत. दरम्यान, त्यांनी यापूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळीही सभा घेतल्या होत्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *