तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायचंय?, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचं असल्यास नागरिकांना पतप्रधान कार्यालयानं दिलेल्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. (How to meet Narendra Modi)

 • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
 • Published On - 17:37 PM, 21 Jan 2021
तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायचंय?, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबूक आणि इतर माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चाहते त्यांना फॉलो करतात. देशातील नागरिक त्यांना मन की बातसाठी विषय सूचवत असतात. नरेंद्र मोदी यांच्या सभांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होत असते. काही चाहते त्यांना वेगवेगळ्या गोष्टी पाठवत असतात. पंतप्रधान कार्यालय देखील देशातील नागरिकांना उत्तर देत असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचं असल्यास नागरिकांना www.pmindia.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे. (Know how to meet Prime Minister Narendra Modi full process here)

नरेंद्र मोदी सतत कामामध्ये व्यस्त असल्याचं दिसून येते. त्यामुळे त्यांची भेट होणं कठिण असल्याचं मानलं जाते. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही नरेंद्र मोदींपर्यंत तुमचे विचार पोहोचवू शकता. वेबसाईट नोंदणी करुन शक्य झाल्यास तुम्ही नरेंद्र मोदी यांना भेटू शकता.

पंतप्रधान कार्यालायनं दिलेल्या माहितीनुसार वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर पीएमओ पंतप्रधानांची वेळ घेईल. पंतप्रधानांना वेळ असल्यास थेट पंतप्रधानांची भेट घेता येईल.

नरेंद्र मोदी यांची अपॉइंटमेंट घेण्याची प्रक्रिया

 1.  सर्वप्रथम www.pmindia.gov.in वर जावा.
 2.  वेबसाईवर Interact with PM लिंकवर क्लिक करा.
 3.  आता स्क्रीनवर दोन ऑप्शन दिसतील त्याद्वारे तुम्ही मोदींपर्यंत तुमचं मत पोहोचवू शकता.
 4. दुसरा ऑप्शन वापरून तुम्ही तुमचा सल्ला प्रतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवू शकता.
 5. पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी एक लिंक असेल त्यावर क्लिक करुन अर्ज भरावा लागेल.
 6. अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल.
 7. तुम्हाला आता Appointment with PM या लिंकवर क्लिक करावं लागेल.
 8. नरेंद्र मोदी यांना भेटण्यामागील कारण लिहावं लागेल.
 9. हा अर्ज भरल्यानंतर तुमची विनंती पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचेल.

मुलाखती ऐवजी नरेंद्र मोदींपर्यंत मत पोहोचवण्याचे इतर मार्ग

तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तुमचं म्हणंन मांडायचं असेल, कोणती तक्रार करायची असेल, शुभेच्छा द्यायच्या असतील तर वेबसाईटवर सुविधा उपलब्ध आहे. यावेळी तुम्हाला Appointment with PM हा पर्याय निवडण्याची गरज नाही. भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाचा कारभार पाहायचा असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सामान्य नागरिकांना भेटण्यासाठी कमी वेळ असतो. लोकशाही देशामध्ये पंतप्रधानांना भेटण्याचा अधिकार देशातील नागरिकांना असतो. वेबसाईटवरील इतर मार्गांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत तुमचं मत पोहोचवू शकता.

संबंधित बातम्या:

BREAKING: पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्रीही लस घेणार; केंद्राचा मोठा निर्णय

स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत जाणं आता सोप्पं, जाणून घ्या मोदींनी उद्घाटन केलेल्या 8 रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक

(Know how to meet Prime Minister Narendra Modi full process here)