भोपाळची पहिली महिला कुली, पतीच्या निधनानंतर खांद्यावर जबाबदारी

स्वप्न मोठी असतील आणि त्यासाठी आपण मेहनत केली तर यश नक्कीच मिळते. याबाबतची अनेक उदाहरणं आपण आतापर्यंत पाहिली असतील. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेकांनी वाईट परिस्थितीतूनही आज उंच भरारी घेतली आहे.

First Women Coolie, भोपाळची पहिली महिला कुली, पतीच्या निधनानंतर खांद्यावर जबाबदारी

भोपाळ (मध्य प्रदेश) : स्वप्न मोठी असतील आणि त्यासाठी आपण मेहनत केली तर यश नक्कीच मिळते. याबाबतची अनेक उदाहरणं आपण आतापर्यंत पाहिली असतील. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेकांनी वाईट परिस्थितीतूनही आज उंच भरारी घेतली आहे. अशाच वाईट परिस्थितींना महिलाच अशा असतात की ज्या ठामपणे सामोरे जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेची ओळख करुन देणार आहोत. ज्या महिलेने आपले कुटुंब, मुलं आणि भविष्य सुधरवण्यासाठी तिने अनेक संकटांना तोंड दिलं. आयुष्य ओझं वाटू नये म्हणून या महिलेने इतरांचे ओझं आपल्या डोक्यावर उचललं आहे. या महिलेचं नाव लक्ष्मी आहे जी भोपाळमधील पहिली महिला कुली (First Women Coolie) बनली आहे.

First Women Coolie, भोपाळची पहिली महिला कुली, पतीच्या निधनानंतर खांद्यावर जबाबदारी

लक्ष्मी यांचे पती राकेश यांचा अचानक मृत्यू झाल्याने घराचा आधार गेला होता. त्यामुळे नवऱ्याच्या जागेवर कुलीचे (Coolie) काम करण्यापलीकडे लक्ष्मी समोर दुसरा पर्याय नव्हता. तिचा मुलगा सरकारी शाळेत शिकत होता. पण पैसे नसल्याने त्याची फी भरण्यासाठीही तिच्याकडे पैसे नाव्हते. त्यामुळे लक्ष्मीने राकेशच्या जागेवर काम करण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मीच्या पतीच्या मित्रांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विनंती करुन लक्ष्मीला बिल्ला नंबर 13 मिळवून दिला. आता याच 13 नंबरच्या बिल्ल्याने लक्ष्मीच भोपाळ स्टेशनवर वेगळी ओळख बनली आहे.

First Women Coolie, भोपाळची पहिली महिला कुली, पतीच्या निधनानंतर खांद्यावर जबाबदारी

लक्ष्मी भोपाळची पहिली महिला कुली आहे. लक्ष्मी दररोज रात्री भोपाळ स्टेशनवर काम करते. संध्याकाळी 6 वाजता कामाला सुरुवात करते ते मध्य रात्रीपर्यंत ती काम करते.

First Women Coolie, भोपाळची पहिली महिला कुली, पतीच्या निधनानंतर खांद्यावर जबाबदारी

“कुलीचं काम करणे ही माजी मजबूरी आहे. कारण मला माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी हे काम करावं लागत आहे. इतरांप्रमाणे मलाही माझ्या मुलाला चांगल्या शाळेत टाकायचे आहे आणि खूप मोठं बनवायचे आहे. मला माझे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. पण सरकारच्या मदतीशिवाय मला हे अशक्य वाटत नाही. फक्त कुलीचे काम करुन माझे हे स्वप्न पूर्ण होईल असं मला वाटत नाही”, असं लक्ष्मी म्हणाली.

लक्ष्मीचा मुलगा इयत्ता चौथीत शिकत आहे. त्याने ठरवलं आहे की, मोठं होऊन त्याला न्यायाधीश बनायचे आहे. मी मोठा होऊन काम करणार आणि माझ्या आईला काम करु देणार नाही, असं लक्ष्मीचा मुलगा म्हणाला.

First Women Coolie, भोपाळची पहिली महिला कुली, पतीच्या निधनानंतर खांद्यावर जबाबदारी

अनेक प्रवासी महिला कुली पाहून आनंदी होतात. महिला जर कुलीचे काम करत असेल, तर महिला प्रवाशांसाठी हे चांगलं आहे, ज्यामुळे आमचे सामान सुरक्षित राहील, असं काही महिला प्रवाशांनी सांगितले.

First Women Coolie, भोपाळची पहिली महिला कुली, पतीच्या निधनानंतर खांद्यावर जबाबदारी

अशा अनेक महिला आहेत, ज्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत काम केलं आहे. आज मजबुरीमुळे लक्ष्मीला हमालीचे काम करावे लागत आहे. त्यामुळे अनेकजण लक्ष्मीचे कौतुक करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *