लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली, श्वास घेण्यासाठी होतोय त्रास

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली, श्वास घेण्यासाठी होतोय त्रास

लालूंना न्यूमोनिया आहेच पण आता श्वास घेण्यासाठीही अडचण होत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jan 22, 2021 | 7:00 AM

पाटना : राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची गुरुवारी संध्याकाळी अचानक प्रकृती खराब झाल्याची माहिती समोर येत आहे. लालू प्रसाद हे आधीपासूनच रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये (RIMS Hospital) उपचार घेत आहे. हाती आलेल्या अहवालानुसार, लालूंना न्यूमोनिया आहेच पण आता श्वास घेण्यासाठीही अडचण होत आहे. लालू प्रसाद यांनी रुग्णालयात दाखल करताच आरोग्यमंत्री बन्ना गुप्ताही रिमझमध्ये पोहोचले. झारखंडचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव हे थोडे आजारी आहेत. त्यांना फुफ्फुसांचा संसर्ग आहे आणि सध्या त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. (lalu prasad yadav health updates deteriorated ranchi rims hospital bihar jharkhand News)

लालू प्रसाद यांची डॉक्टरांनी तातडीने कोव्हिड चाचणी केली असून त्यांच्या फुफ्फुसांची आणि छातीची तपासणीदेखील करण्यात आली केली. अँटिजेन टेस्टमध्ये लालूंचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. तर आरटीपीसीआरच्या तपासणी अहवाल अद्याप येणं बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर फुफ्फुसातील संसर्गामुळे शुक्रवारी त्यांचा एचआर सिटी केला जाणार आहे.

लालूंच्या छातीमध्ये इन्फेक्शन

अहवालानुसार, एक्स-रे काढला असता लालूच्या छातीला इन्फेक्शन झाल्याचं दिसून आलं. याबाबत रिम्सच्या डॉक्टरांनी एम्सच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. जेलचे आयजी वीरेंद्र भूषण यांनी सांगितलं, की लालू प्रसाद यांची प्रकृती बिघडली असून डॉ उमेश प्रसाद आणि रिम्सच्या पथकाने त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. यावेळी त्यांची कोव्हिड चाचणी, ईसीजी, इको, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, एक्स-रे यासह अनेक तपासण्याही करण्यात आल्या आहेत.

दुमका कोषागार प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा

खरंतर, चारा घोटाळ्याशी संबंधित असलेल्या दुमका कोषागार प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना 14 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. लालू प्रसाद 23 डिसेंबर 2017 पासून तुरूंगात आहेत. कारण, त्यांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर लालूंवर बर्‍याच आजारामुळे रुग्णालयात उपचार सुरू होते. (lalu prasad yadav health updates deteriorated ranchi rims hospital bihar jharkhand News)

संबंधित बातम्या – 

अर्ध्याहून अधिक भारतीय तिबेटप्रती असंवेदनशील : सर्वेक्षण

ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; सहकाऱ्याकडून नव्या पक्षाची स्थापना

घरात पेटवलेली शेकोटी ठरली शेवटची, आई-वडिलांसह कुशीतच चिमुकल्याचाही मृत्यू

(lalu prasad yadav health updates deteriorated ranchi rims hospital bihar jharkhand News)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें