संपूर्ण देशात लॉकडाऊन, कुठे काय सुरु आणि काय बंद?

पुढील 21 दिवस नेमकं काय सुरु असणार आणि काय बंद राहणार असा प्रश्न विचारला जात आहे (Things open in Lockdown amid Corona). याबाबत सरकारने या काळातही उपलब्ध असणाऱ्या वस्तू आणि सेवांची यादी दिली आहे.

संपूर्ण देशात लॉकडाऊन, कुठे काय सुरु आणि काय बंद?

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत जगभरातील 140 पेक्षा अधिक देशात या विषाणूने शिरकाव केला आहे (Maharashtra lock down due to corona). अडीच लाखांहून अधिक लोक या विषाणूचे शिकार झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही आज (24 मार्च) 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे देशभरातील सर्व रेल्वे गाड्या आणि वाहतूक सेवा बंद झाली आहे. खासगी बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील 21 दिवस नेमकं काय सुरु असणार आणि काय बंद राहणार असा प्रश्न विचारला जात आहे (Things open in Lockdown amid Corona). याबाबत सरकारने या काळातही उपलब्ध असणाऱ्या वस्तू आणि सेवांची यादी दिली आहे. ती खालीलप्रमाणे,

 1. खाद्य पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यासह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण सुरु राहिल
 2. अत्यावश्यक सेवा देणारी सरकारी कार्यालयं किमान मनुष्यबळासह (5 टक्के) सुरु राहतील. यात लेखा आणि कोषागरे, वाणिज्य दुतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये सुरु राहतील
 3. शेतीमाल आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची आयात-निर्यात सुरु राहिल
 4. अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक सुरु राहिल
 5. खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण सुरु राहिल
 6. बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा सुरु
 7. उपाहारगृहांमधून घरपोच सेवा सुरु
 8. औषधी निर्मिती, डाळ व भात गिरणी, इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ निर्मिती, साखर, दुग्धजन्य पदार्थ, पशुखादय, चारा निर्मिती घटक सुरु
 9. रूग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक सुरु
 10. पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था सुरु
 11.  टँकर्सदवारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा सुरु
 12.  बॅंका/एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा (स्टॉक एक्सचेंज, क्लिअरींग ऑपरेशन्स, म्युचवल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या सुरु राहतील
 13. टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा सुरु
 14. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे सुरु
 15. बंदरे आणि त्यावरुन होणारी वाहतूक, मनुष्यबळ,कंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयन,साठवणूक, कस्टम हाऊस एक्सचेंजची कार्यालये, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा सुरु
 16. पावसाळयापूर्वीची सर्व अत्यावश्यक कामे सुरु
 17. अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षासेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था सुरु
 18. अत्यावश्यक सेवांना किंवा कोविड १९ प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणारी खासगी आस्थापने सुरु
 19. लोकांच्या वाहतुकीवर निर्बंध, मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या दळण-वळणावर निर्बंध नाहीत
 20. अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था आणि संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असं ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक असेल.


दरम्यान, कोविड 19 (कोरोना विषाणू) याचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने आधीच संपूर्ण महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लाॅकडाऊन जाहीर केला. केंद्रीय गृहसचिवांनीही याची अधिसूचना जारी करत वरील गोष्टींना सूट असल्याचं स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या:

21 दिवस महत्त्वाचे, अन्यथा संपूर्ण देश 21 वर्ष मागे जाईल : नरेंद्र मोदी

संपूर्ण देशभरात लॉकडाऊन, जनता कर्फ्यूपेक्षा कडक कर्फ्यू, घराबाहेर पडण्यास मज्जाव : पंतप्रधान मोदी

भारतात लॉकडाऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

घाबरु नका, लॉकडाऊनमध्ये किराणा आणि मेडिकल उघडी राहणार : नवाब मलिक

 माझं पंतप्रधान मोदींशी बोलणं झालं, घाबरु नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

संबंधित व्हिडीओ :

Things open in Lockdown amid Corona

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *