AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमलनाथांची राजकीय खेळी, विधानसभा 26 मार्चपर्यंत स्थगित झाल्याने बहुमत चाचणी लांबणीवर

मध्य प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे (Madhya Pradesh Floor Test Postpone). विधानसभा अध्यक्ष नर्मदा प्रसाद प्रजापती यांनी विधानसभेत गोंधळ झाल्याने विधानसभेचं कामकाम थेट 26 मार्चपर्यंत स्थगित केलं आहे.

कमलनाथांची राजकीय खेळी, विधानसभा 26 मार्चपर्यंत स्थगित झाल्याने बहुमत चाचणी लांबणीवर
| Updated on: Mar 16, 2020 | 12:25 PM
Share

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे (Madhya Pradesh Floor Test Postpone). विधानसभा अध्यक्ष नर्मदा प्रसाद प्रजापती यांनी विधानसभेत गोंधळ झाल्याने विधानसभेचं कामकाम थेट 26 मार्चपर्यंत स्थगित केलं आहे. त्यामुळे बहूमत चाचणी सध्या तरी टळल्याचं दिसत आहे. मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ सिंह यांना आज (16 मार्च) बहूमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काय होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी आज जाहीर केलेल्या कामकाजात बहूमत चाचणीचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष बहूमत चाचणीवर समोरासमोर उभे राहिल्याचं दिसत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस आणि भाजपने राज्यपालांच्या आदेशानंतर आपल्या आमदारांना व्हिप जारी करत विधानसभेत हजर राहण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा : गुजरात काँग्रेसमध्ये भूकंप, चार आमदारांच्या राजीनाम्याने राज्यसभेच्या जागेला हादरा

आज मध्य प्रदेश विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणानंतर जोरदार गोंधळ झाला. याआधी मुख्यमंत्र कमलनाथ सिंह यांनी राज्यपालांना पत्र लिहलं होतं. यात भाजपने काँग्रेस आमदारांना कर्नाटक पोलिसांच्या मदतीने बंदिस्त करुन ठेवल्याचा आरोप केला होता. तसेच अशा वातावरणात बहुमत चाचणी घेणे लोकशाहीच्या विरोधात आणि असंवैधानिक असेल असं म्हटलं होतं. तसेच अशा परिस्थितीत बहूमत चाचणी घेण्याला काहीही महत्व उरत नाही असं सांगितलं.

कमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा लांबणीवर

विधानसभेचं कामकाम 26 मार्चपर्यंत स्थगित झाल्यानं सध्या तरी मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा लांबणीवर पडली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर प्रचंड गदारोळ झाला. यानंतर विधानसभेचं कामकाज 26 मार्चपर्यंत स्थगित झालं.

दरम्यान, राज्यपाल लालजी टंडन यांच्या आदेशानुसार हात उंचावून बहुमत चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी भाजपनं केली होती. ‘विधानसभेच्या सभागृहातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा काम करत नसल्यामुळे हात उंचावून मतदान घेण्यात यावे,’ अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्ष नेते गोपाल भार्गव यांनी केली होती.

मध्य प्रदेशातील 22 आमदारांनी राजीनामा सादर केला असला, तरी सहा जणांचे राजीनामेच मान्य करण्यात आले आहेत. त्यामुळे विधानसभेचं संख्याबळ 222 वर पोहचलं आहे, तर बहुमताचा आकडा 112 आहे. विरोधीपक्षातील भाजपकडे 107 आमदारांची ताकद आहे. काँग्रेसचं संख्याबळ (114 + 7 – 22 = 99) वर पोहोचलं आहे.

“बंदिस्त आमदारांची सुटका करा आणि बहूमत चाचणी घ्या”

राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विश्वासमताला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. ‘मी राज्यपालांना सांगितले आहे की मी फ्लोअर टेस्टसाठी तयार आहे. ज्या आमदारांना बंदिस्त करण्यात आले आहे त्यांची सुटका करावी. मी उद्या त्याविषयी सभापतींशी बोलणार आहे’ अशी प्रतिक्रिया कमलनाथ यांनी दिली होती.

ज्योतिरादित्य शिंदे समर्थक 22 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने विधानसभेत बहुमत गमावले आहे, असा दावा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला होता.

संबंधित बातम्या:

कमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा, विश्वासमत चाचणी घेण्याचे मध्य प्रदेशच्या राज्यपालांचे आदेश

गुजरात काँग्रेसमध्ये भूकंप, चार आमदारांच्या राजीनाम्याने राज्यसभेच्या जागेला हादरा

‘फ्लोअर टेस्ट’ ऐवजी ‘कोरोना टेस्ट’, मध्य प्रदेशात कमलनाथांची अग्निपरीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता

Madhya Pradesh Floor Test Postpone

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.