महाविकास आघाडीचं स्टेअरिंग ठाकऱ्यांच्याच हाती, भाजपला पोटदुखीचा त्रास; संजय राऊतांचा हल्लाबोल

महालक्ष्मी येथील विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकत्र पाहणी केली. यावेळी दोन्ही नेते एकाच गाडीत बसून गेले. इतकेच नव्हे तर आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीचं स्टेअरिंग ठाकऱ्यांच्याच हाती, भाजपला पोटदुखीचा त्रास; संजय राऊतांचा हल्लाबोल
महाविकास आघाडीचं स्टेअरिंग ठाकऱ्यांच्याच हाती, भाजपला पोटदुखीचा त्रास; संजय राऊतांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 10:58 AM

पणजी: महालक्ष्मी येथील विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार  (ajit pawar) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी एकत्र पाहणी केली. यावेळी दोन्ही नेते एकाच गाडीत बसून गेले. इतकेच नव्हे तर आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत होते. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन्ही नेते एकत्र विकास कामांची पाहणी करत आहेत. एकत्र सोबत जात आहेत ही उत्तम गोष्ट आहे. पण त्यामुळे भाजपच्या पोटात कळ येत आहे. दाब दबावाचे राजकारण करून, धमक्या देऊनही महाविकास आघाडीला तडा जात नाही ही भाजपची पोटदुखी आहे, असं सांगतानाच या सरकारचं स्टेअरिंग ठाकऱ्यांच्याच हाती आहे आणि राहील, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राला कितीही वाकवण्याचा, झुकवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र अजिबात झुकणार नाही, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला. गोव्यात मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा इशारा दिला आहे.

आदित्य ठाकरे आणि अजित पवारांनी एकत्र विकास कामांची पाहणी केली. तसेच अजित पवार आणि आदित्य ठाकरे एकाच गाडीतून गेले. आदित्य यांनी स्वत: गाडी चालवली, याकडे संजय राऊत यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. उत्तम आहे. हीच भाजपची कळ आहे. भाजपच्या पोटात वेगवेगळ्या प्रकारची कळ याच कारणामुळे येते. महाविकास आघाडीचे नेते एकत्र असल्याने त्यांची पोटदुखी आहे. दाबदबावाचे राजकारण करून, धमक्या दहशतीचं राजकारण करूनही महाविकास आघाडीला तडा जात नाही. कधीच जात नाही ही त्यांची पोटदुखी आहे, असं सांगतानाच या सरकारचं स्टेअरिंग ठाकऱ्यांच्याच हाती आहे आणि राहिल, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्र झुकणार नाही

महाराष्ट्राला झुकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला वाकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण महाराष्ट्राचा इतिहास लढण्याचा आहे. तुमच्या छाताडावर पाय देऊन उभे राहू. महाराष्ट्र कधीच झुकणार नाही, असंही त्यांनी निक्षून सांगितलं.

माझी संपत्ती घेऊन टाका

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राऊत यांच्या संपत्तीबाबत भाष्य केलं होतं. त्यालाही त्यांनी उत्तर दिलं. आधी तुमच्या संपत्या पाहा. माझी संपत्ती हवी असेल तर घेऊन जा. माझी अशी कुठली संपत्ती नाहीये. मराठी माणसाच्या हातात पैसा राहू नये, मराठा माणूस कंगाल राहवा यासाठीचं षडयंत्र सुरू आहे. याचं उत्तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

कंबोज यांना टोला

राऊत यांनी महापालिकेची निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान भाजप नेते मोहीत कंबोज यांनी दिलं होतं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. राऊतांनी कुणाला उत्तर द्यावं हा प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. मी उत्तर दिलं तर माणूस मोठा होतो, असा टोला राऊत यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

रामदास आठवलेंकडून शशी थरुर यांना इंग्रजीचे धडे, आठवलेजी तुमची जेएनयूमध्ये गरज, थरुर यांच्याकडून स्पेलिंगमधील गफलत मान्य

आमच्या नद्यांमध्ये बेवारस प्रेतं फेकली नाहीत, अन् महाराष्ट्राला सुपरस्प्रेडर म्हणता, राऊतांचे मोदींना उत्तर

भंडाऱ्याच्या मोहाडी नगरपंचायतीत नगराध्यक्षपद कुणाकडे? भाजपमध्ये दुफळी, राष्ट्रवादी वेळ साधणार?

Non Stop LIVE Update
तरच मतदान करणार...बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
तरच मतदान करणार...बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार.
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल.
अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण.
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?.
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.