AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम तरी करू नका; संभाजी छत्रपती यांना कुणाचं खरमरीत पत्र?

मराठी माणसाला तुम्हाला बळ देता येत नसेल तरी तुमच्याकडे आमचा आग्रह नाही. पण ज्या छत्रपतींचे नाव घेऊन सीमाभागात मराठी माणूस लढतो, त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपण करू नये ही विनंती.

मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम तरी करू नका; संभाजी छत्रपती यांना कुणाचं खरमरीत पत्र?
sambhaji chhatrapatiImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 06, 2023 | 2:27 PM
Share

बेळगाव : कर्नाटकातील राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दुसऱ्यांदा अनावरण करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी हा सोहळा घडवून आणला. या सोहळ्याला महाराष्ट्रातील नेत्यांनी उपस्थित राहू नये. खासकरून संभाजी छत्रपती यांनी उपस्थित राहू नये, अशी विनंती सीमाभागातील जनतेने केली होती. मात्र, या विनंतीला न जुमानता संभाजी छत्रपती, आमदार सतेज पाटील आणि लातूरचे आमदार धीरज देशमुख यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी धीरज देशमुख यांनी या कार्यक्रमात “जय कर्नाटक”चा नारा देत सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. या दोन्ही मुद्द्यांवरून महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी संभाजीराजेंना खरमरीत पत्र लिहिलं आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचं पत्र जसंच्या तसं

महोदय,

रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी किल्ले राजहंसगड बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास हजर झाला. त्याबद्दल सीमावासियांच्या भावना इथे व्यक्त करीत आहे. मराठी भाषेसाठी गेली 66 वर्ष मराठी माणूस निरंतर लाठ्याकाठ्या झेलत संघर्ष करत आला आहे. अनेक लोकांनी जीवाचे बलिदान देऊन हा संघर्ष तेवत ठेवला. राजहंसगडावर शिवमूर्तीची जी प्रतिष्ठापना करण्यात आली त्या पाठीमागे आणि त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या पाठीमागे राजकीय पार्श्वभूमी होती. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने आपणास या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती केली होती. कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्या विरोधात मराठी माणसाने वेळोवेळी आंदोलने केली. प्रसंगी कारावासही भोगला.

त्या संघर्षाचा संदर्भ देत आपणास त्या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती करण्यात आली होती. आम्ही आजवर छत्रपतीच्या गादीचे वारस म्हणून तुम्ही आमच्या सोबत आहात असे मानत होतो. परंतु आमच्या ह्या समजाला तुम्ही हरताळ फासला आहे. तुमच्या उपस्थितीतच महाराष्ट्रातील आमदार धीरज देशमुख यांनी “जय कर्नाटक” असे उद्गार काढले. आपण छत्रपतीचे वारस म्हणवता तर मराठी विरोधी या घटनेचे आपण साक्षीदार होऊन सीमावासियांच्या आदरास पात्र ठरत आहात.

मराठी माणसाला तुम्हाला बळ देता येत नसेल तरी तुमच्याकडे आमचा आग्रह नाही. पण ज्या छत्रपतींचे नाव घेऊन सीमाभागात मराठी माणूस लढतो, त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपण करू नये ही विनंती. बेळगावतील मराठी माणसाचा लढा हा छत्रपतीच्या रयतेचा आहे. आपण त्याचे पाईक मानले जाता. तरी कृपया मराठी माणसाचा आपण घात करू नये, अशी सीमा भागातील जनतेची इच्छा आहे. कोल्हापूरकर जनतेने नेहमीच बेळगावकर जनतेची पाठराखण केली.

आपण आपली भूमिका कोल्हापूरच्या जनतेसारखी ठेवाल अशी अपेक्षा. नाहीतर कोल्हापूरकर जनतेची आणि तुमची नाळ तुटली आहे काय? अशी शंका येण्यास वाव मिळतो. छत्रपतीच्या विचारांचे आम्ही वारस आहोत. त्यांच्या नावाने आम्ही लढा देत आहोत. आम्ही नक्कीच विजयी होणार आहे. तुम्ही आमच्या सोबत यावे ही श्री चरणी प्रार्थना कळावे.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......