मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर मेजर रमेश उपाध्याय यांची प्रतिक्रिया, कोर्टाचे आभार मानत…
29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9.35 वाजता मालेगावच्या भिक्कू चौकात बॉम्बस्फोट झाला. आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. सर्वांची निर्दोष मुक्तता होताच मालेगावात हिंदुत्ववादी संघटना जल्लोष करताना दिसत आहेत.

29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9.35 वाजता मालेगावच्या भिक्कू चौकात बॉम्बस्फोट झाला आणि संपर्ण देश हादरून गेला. आज या बॉम्बस्फोटाचा निकाल लागलाय. आरोपींच्या विरोधात पुराव्यांचा अभाव असल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. सर्वांची निर्दोष मुक्तता होताच मालेगावात हिंदुत्ववादी संघटना जल्लोष करताना दिसत आहेत. दुसरीकडे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी यादरम्यानच्या काळात आपल्यासोबत काय घडले आणि आपल्याला कशापद्धतीने मारहाण करण्यात आली आणि छळण्यात आले हे त्यांनी सांगितले.
मेजर रमेश उपाध्याय यांच्याविरोधात पुरावा नाही
आता कोर्टाच्या या निकालानंतर मेजर रमेश उपाध्याय यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आभार मानले आहेत. आमच्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना आम्हाला फसवले गेले. मेजर रमेश उपाध्याय यांच्या विरोधात पुरावा नसल्याचे कोर्टाने निकालादरम्यान म्हटले आहे. फक्त संशयावर आरोपींना शिक्षा होऊ शकत, नसल्याचे कोर्टाने स्पष्ट म्हटले.
मालेगाव बॉम्बस्फोटाचा तब्बल 17 वर्षांनंतर निकाल
स्फोटानंतर तब्बल 17 वर्षांनी कोर्टाने हा निकाल दिलाय. मोबाईलमध्येही कोणत्याही प्रकारची पुरावे आढळून आली नाहीत. या निकालाकडे संपूर्ण देशाच्या नजरा बघायला मिळाल्या. शेवटी हा निकाल कोर्टाकडून देण्यात आलाय. या बॉम्बस्फोटात आरोप झालेल्या 7 जणांची निर्दोष मुक्तता कोर्टाने केलीये. आज सकाळीच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतर आरोपी कोर्टात पोहोचले होते. शेवटी कोर्टाने हा निकाल दिलाय.
बॉम्बस्फोटानंतर नेमक काय काय घडलं, कोर्ट काय म्हणाले..
न्यायाधीश ए. के. लाहोटींकडून निकालाचे वाचन करण्यात आले. बॉम्बस्फोटानंतर नेमक काय काय घडलं हे देखील त्यांनी सुनावणीदरम्यान सांगितले आहे. या निकालानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आैवेंसींनी या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या निकालानंतर सोशल मीडियवर एक पोस्ट शेअर केली आहे. उपुमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासोबतच सात जणांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
