ममता बॅनर्जींचा बंगालच्या सुपुत्राला पाठिंबा, भाजपवर पुन्हा एकदा निशाणा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. Mamata Banerjee criticize Central Govt

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:10 PM, 28 Dec 2020
ममता बॅनर्जींचा बंगालच्या सुपुत्राला पाठिंबा, भाजपवर पुन्हा एकदा निशाणा
ममत बॅनर्जी

कोलकाता: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या विरोधात विचार मांडल्यामुळे नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना भाजपकडून टार्गेट केले जातेय, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. (Mamata Banerjee criticize Modi Govt)

ममत बॅनर्जींनी नुकतंच अमर्त्य सेन यांना पत्र लिहून त्यांच्या संपत्तीचा वाद निर्माण झाल्यावरुन खेद व्यक्त केला होता. केंद्रीय विद्याप विश्वभारतीनं काही दिवसांपूर्वी अमर्त्य सेन यांच्या कुटुंबावर अवैधरित्या कब्जा केला असल्याचं म्हटलं होते.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममत बॅनर्जी अमर्त्य सेन यांच्याबाजूनं उभ्या राहिलेल्या दिसून येतात. अमर्त्य सेन यांनी केंद्र सरकारविरोधात बोलल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातय हा आरोप केला. अमर्त्य सेन यांना निशाणा बनवलं जाणं, स्वीकारले जाणार नाही. राजकीय विचार मांडल्यामुळे ज्या प्रमाण मला टार्गेट केलं जातंय त्या प्रमाणं सेन यांना देखील टार्गेट केले जातंय असं म्हटलं.

दरम्यान, अमर्त्य सेन यांनी पत्र लिहून ममता बॅनर्जींचे आभार मानले आहेत. बॅनर्जी यांच्या पाठिंब्यामुळे शक्ती मिळाल्याचंही त्यांनी म्हटलंय. नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर विश्वभारती विद्यापीठाचे कुलगुरु काम करत असल्याचा आरोप केला होता.

बंगालचं राजकारण तापलं

भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसाच्या दौऱ्यात संपूर्ण पश्चिम बंगालमधील राजकारण ढवळून काढले होते. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे खासदार, आमदार आणि नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊन शहा यांनी निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. मात्र, शहा यांचा दौरा आटोपताच भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता यांनी टीएमसीत प्रवेश केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर पत्नीच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या खासदाराने थेट पत्नीलाच तलाक देण्याची नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.  ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी राहिलेले सुवेंदू अधिकारींनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मात्र, वाढत्या इनकमिंगमुळे पश्चिम बंगाल भाजपमध्ये नाराजी वाढल्याचं चित्र आहे.

संबंधित बातम्या:

ममता बॅनर्जी-अमित शाह, दोघांमध्ये कोण श्रीमंत, कुणाकडे किती पैसा?

‘…तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन’, भर सभेत प्ले कार्ड्स दाखवल्यामुळे ममता बॅनर्जी भावूक

(Mamata Banerjee criticize Modi Govt)