ममतादीदींनी मोदींना अर्धा तास वाट पाहायला लावली; नुकसानीचा अहवाल दिला अन् निघून गेल्या

ममतादीदींनी मोदींना अर्धा तास वाट पाहायला लावली; नुकसानीचा अहवाल दिला अन् निघून गेल्या
PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालमधील नुकसानीची शुक्रवारी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. (Mamata meets PM to submit report on damage in Bengal, skips review meet)

भीमराव गवळी

|

May 28, 2021 | 7:42 PM

कोलकाता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालमधील नुकसानीची शुक्रवारी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. मात्र, या बैठकीसाठी त्यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तब्बल अर्धा तास वाट पहावी लागली. ममतादीदी अर्धा तास उशिरा आल्या. आल्या आल्या त्यांनी 20 हजार कोटींच्या नुकसानीचा अहवाल केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या हवाली केला आणि त्या लगेच मिटिंगमधून निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Mamata meets PM to submit report on damage in Bengal, skips review meet)

यास चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीला राज्यपाल जगदीप धनखडही उपस्थित होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येणार म्हणून या दोन्ही नेत्यांनी त्यांची अर्धा तास वाट पाहिली. मिटिंगमध्ये आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लगेच केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे चक्रीवादळामुळे झालेल्या 20 हजार कोटींच्या नुकसानीचा रिपोर्ट दिला. त्यानंतर दुसऱ्या मिटिंगला जायचे सांगून त्या मिटिंगमधून निघून गेल्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राज्यपालांचं ट्विट

या घटनेवर राज्यपाल धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संघर्षाचा हा पवित्रा राज्य आणि लोकशाहीच्या हिताचा नाही. मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांचं बैठकीत भाग न घेणं संवैधानिकता वा कायद्याच्या शासनानुरुप नाही, असं ट्विट धनखड यांनी केलं आहे.

ममतादीदींचा खुलासा

ममता बॅनर्जी यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दीघाकडे जाण्यापूर्वी मोदींना परिस्थितीची माहिती दिली होती. हिंगलगंज आणि सागरमध्ये आढावा बैठक घेतल्यानंतर मी कालाईकुंडा येथे पंतप्रधानांना भेटले. त्यावेळी त्यांना पश्चिम बंगालमधील परिस्थितीची माहिती दिली. माहितीसाठी त्यांना आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल दिला आहे. आता मी दीघा येथे मदत कार्य आणि पुनर्वसनाचा आढावा घेण्यासाठी जात आहे, असा खुलासा ममतादीदींनी केला.

पंतप्रधानांना दिलेली वागणूक योग्य नाही

या घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजची घटना स्तब्ध करणारी आहे. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान या व्यक्ती नाहीत, तर त्या संस्था आहेत. दोघेही जनसेवेचा संकल्प आणि संविधानाच्या प्रती निष्ठेची शपथ घेऊन दायित्वाचं वहन करतात. आपत्तीच्या काळात मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान बंगालमध्ये आले. मात्र, त्यांना देण्यात आलेली वागणूक योग्य नाही. त्रासदायक आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. (Mamata meets PM to submit report on damage in Bengal, skips review meet)

संबंधित बातम्या:

Cyclone Yaas: PM मोदींकडून ओडिशा, बंगाल अन् झारखंडला 1000 कोटींची आर्थिक मदत

पंतप्रधान मोदींना कोविड 19 आजपर्यंत समजलाच नाही, त्यामुळे लाखोंचा मृत्यू, आकडेवारीतही खोटारडेपण : राहुल गांधी

31 मे पासून दिल्लीत अनलॉक, कारखाने, बांधकामांना परवानगी, महाराष्ट्रात काय स्थिती?

(Mamata meets PM to submit report on damage in Bengal, skips review meet)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें