जबरदस्तीने करत होता Kiss, तरुणीने चावून जिभेचा तुकडाच पाडला; हादरवणारी घटना समोर!
UP Crime: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका तरूणाने एका मुलीली जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरूणीने विरोध करत या तरूणाची जीभ कापल्याची घटना समोर आली आहे.

अनेक तरूण विनाकारण तरूणींना त्रास देत असतात. अशाच एका तरूणाला एका तरूणीने अद्दल घडवली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका तरूणाने एका मुलीली जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला, मात्र याचा त्याला मोठा फटका बसला आहे. या तरूणीने दातांनी त्याची जीभ चावली असून त्याच्या जीभेचे दोन तुकडे केले आहेत. या घटनेत तरूण गंभीर जखनी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. तो बरा झाल्यानंतर त्याला पोलीसांकडून अटक केली जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तरुणीने अद्दल घडवली
समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कानपूरच्या बिल्हार परिसरात एक पुरूष तरूणीचा पाठलाग करून तिला त्रास द्यायचा. आता तर त्याने हद्दच केली, त्याने तिला जबरदस्ती पकडून किस केलं, त्यामुळे संतापलेल्या तरूणीने दातांनी त्याची जीभ चावली. यात या तरूणाच्या जीभेचा तुकडा पडला आहे. त्यानंतर आता तरूणीने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सध्या जखमी पुरूषावर रुग्णालयात उपचार सुरू असून तो बरा झाल्यानंतर पोलीस त्याला अटक करणार आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार चंपी असे या पुरूषाचे नाव असून तो विवाहित आहे आणि त्याला दोन मुलेही आहेत. मात्र तरीही चंपी गेल्या काही काळापासून गावातील एका मुलाला त्रास देत होता, तो तिचा पाठलाग करायचा. ही बाब लक्षात येताच तरुणीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही त्याने त्रास देणे सुरुच ठेवले.
मुलीचा पाठलाग करत आरोपी शेतात गेला
सोमवारी ही मुलगी शेतात गेली होती, त्यावेळी चंपी तिच्या मागे गेला आणि तिला जबरदत्तीने पकडले. तो जबरदस्तीने तिला किस करू लागला. त्यामुळे मुलीने प्रतिकार करत त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र ती यात अपयशी ठरली. यानंतर मुलीने संधी मिळतात त्याची जीभ दातात पकडली आणि ती जोरात चावली. यामुळे जीभेचा तुकडा पडला, त्याच्या तोंडातून रक्त वाहू लागले व तो खाली कोसळला.
रुग्णालयात उपचार सुरू
या घटनेनंतर मुलीने तिच्या भावांना याबाबत माहिती दिली, दोघांचेही नातेवाईक शेतात पोहोचले. त्यावेळी चंपीच्या कुटुंबाने मुलीच्या भावाने त्याची जीभ कापल्याचा आरोप केला, मात्र तपासात घटनेवेळी मुलीचे भाऊ तिथे नव्हते अशी माहिती समोर आली आहे. यानंतर पोलीसांनी जखमी तरूणाला बिल्हौर सरकारी रुग्णालयात पाठवले त्यानंतर त्याला कानपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
