Video : ट्राफिक पोलिसांनी दिवसात दुसऱ्यांदा एक हजारांचा दंड ठोठावला, वाहनचालकाचा भडका; भररस्त्यात थेट गाडी पेटवली

तेलंगाणामध्ये देखील नवे वाहतूक नियम लागू करण्यात आले आहेत. नव्या वाहतूक नियमांमुळं वाहनधारकांनी नियम मोडल्यास त्यांना थेट चालान जात आहे. यामुळं काही नागरिक संतप्त होत असल्याचं दिसून आलं आहे.

Video : ट्राफिक पोलिसांनी दिवसात दुसऱ्यांदा एक हजारांचा दंड ठोठावला, वाहनचालकाचा भडका; भररस्त्यात थेट गाडी पेटवली
तेलंगाणामध्ये भररस्त्यात दुचाकी पेटवली

हैदराबाद: भारतात सर्वत्र वाहतूक नियमांचं पालन करण्यासंदर्भात अनेकदा पोलीस आणि वाहनधारक यांच्यात वाद होत असल्याचं चित्र आपल्याला अनेकदा पाहायला मिळतं. देशभरात नवे वाहतूक नियम लागू करण्यात आले आहेत. वाहतूक पोलीस आता रस्त्यावर दंड आकारण्यापेक्षा थेट नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचा फोटो काढून त्यांना चालान पाठवतात. तेलंगाणातील एका व्यक्तीनं संतप्त होऊन थेट दुचाकी भर रस्त्यात पेटवून दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तेलंगाणातील एका व्यक्तीनं वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आकारण्यात आलेल्या दंडामुळं संतप्त होत स्वत:ची बाईक पेटवून दिली. तेलंगाणातील अदिलाबाद जिल्ह्यातील एका व्यक्तीनं आपली गाडीचं भर रस्त्यात पेटवून दिली आहे.

नव्या वाहतूक नियमांमुळं वाहनधारकांमध्ये संताप

तेलंगाणामध्ये देखील नवे वाहतूक नियम लागू करण्यात आले आहेत. नव्या वाहतूक नियमांमुळं वाहनधारकांनी नियम मोडल्यास त्यांना थेट चालान जात आहे. यामुळं काही नागरिक संतप्त होत असल्याचं दिसून आलं आहे. अदिलाबाद जिल्ह्यातील खानापारूमध्ये राहणारा एक व्यक्ती राज्य सरकारनं लावलेल्या नियमांमुळे संतप्त होता. वाहतूक चलनाच्या त्रासाला कंटाळून भर रस्त्यात त्यांनं गाडीला आग लाऊन दिली. यावेळी वाहतूक पोलीस देखील उपस्थिती होते.

स्वत:ची गाडी पेटवून देणाऱ्या व्यक्तीचं नाव मकबूल आहे. मकबूल ड्रायव्हर म्हणून काम करतो. छोट्या छोट्या गोष्टीसाठी एक हजार रुपये दंड कुठून भरायचा? मागच्या चौकात 1 हजार रुपये दंड भरला आहे. या चौकात एक हजार रुपये दंड भरण्यासाठी रक्कम कशी आणायची. पोलीस माझी गाडी परत करत नव्हते. एक हजार रुपये भरुन गाडी कशी चालवायची असं म्हणत त्यानं स्वत:ची गाडीचं पेटवून दिली. भर चौकात पेटवून दिलेली गाडी पोलिसांनी विजवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.

इतर बातम्या:

Maharashtra News LIVE Update | शेतकरी नेते राकेश टिकैत मुंबईत दाखल

Maharashtra Corona Guidelines | नव्या कोरोना विषाणूमुळे यंत्रणा अलर्टवर, राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी

Maqbul a man from  Adilabad district sets bike on fire due to burden of e challans and attitude of traffic police

Published On - 6:50 am, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI