माजी सरन्यायाधीश काटजू यांचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू पुन्हा एकदा वादात आले आहे. त्यांना महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले. एका पॉडकास्टमध्येमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू पुन्हा एकदा वादात आले आहे. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जपानचे एजंट म्हटले आहे. दहा वर्षांपूर्वी आपल्या एका ब्लॉगमध्ये काटजू यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी महात्मा गांधींवरही टीका केली होती. ते म्हणाले होते, ब्रिटीश यांचे फोडा आणि झोडा धोरण महात्मा गांधी यांनी अवलंबले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात संसदेत निषेध प्रस्ताव समंत झाला होता. आता पुन्हा त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील मुद्दा मांडला आहे.
सुभाषचंद्र बोस जपानचे एजंट?
माजी सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी म्हटले की, सुभाषचंद्र बोस जपानसाठी काम करत होते. त्यांनी अनेक वेळा जपानची मदत केली. जपानकडून त्यांचा वापर झाला. त्यावेळी नेताजी यांची उपयुक्ता संपल्यानंतर जपान त्यांची हत्या करणार होता. परंतु १९४५ मध्ये जपानने आत्मसमर्पण केले. त्यानंतर नेताजी कुठे गेले त्याबद्दल कोणालाही माहिती मिळाली नाही. यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस जपानचे एजंट म्हणून काम करत असल्याचा संशय निर्माण झाला, असे काटजू यांनी म्हटले.
गांधी यांच्याबद्दल काय म्हणाले?
एका पॉडकास्टमध्ये माजी सरन्यायाधीस मार्कंडेय काटजू यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना म्हटले की, गांधीजी ब्रिटीश एजंट होते. ब्रिटीश सरकारचे फोडा आणि झोडा धोरण त्यांनी अवलंबले होते. गांधीजी यांच्या धोरणामुळे मुस्लीम समाज मुस्लीम लीगकडे आकर्षित झाले. गांधीजी यांनी भगतसिंग यांचे क्रांतिकारी आंदोलनापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवले. त्यांनी लोकांचे लक्ष सत्याग्रहाकडे नेले.
दहा वर्षांपूर्वी काटजू यांनी एका ब्लॉगमध्ये गांधीजी यांच्याबद्दल म्हटले होते की, महात्मा गांधी यांनी अनेक दशक राजकारणाचा वापर धर्मासाठी केला. फोडा आणि झोडा हे ब्रिटिशांचे धोरण अवलंबले. त्यावेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी निषेध प्रस्ताव मंजूर केला होता. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी याचिका दाखल केली होती.