पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, ओवेसींचा ममतादीदींना युतीचा प्रस्ताव

भाजपला पराभूत करण्यासाठी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत युती करण्याचा प्रस्ताव एमआयएमने तृणमूल काँग्रेसला दिला

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, ओवेसींचा ममतादीदींना युतीचा प्रस्ताव
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 2:35 PM

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकीय आखाड्यात (West Bengal Election 2021) मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) कालपर्यंत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांना भिडण्याची भाषा करत होते, मात्र अचानक त्यांनी ममता दीदींसमोर युतीसाठी हात पुढे केला आहे. त्यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा निर्णय पश्चिम बंगालची सर्व राजकीय समीकरणं बदलू शकतो. (MIM proposes pre poll alliance with TMC for West Bengal Election 2021)

बिहारमध्ये पाच जागा जिंकून आत्मविश्वास दुणावलेल्या ओवेसींची नजर आता पश्चिम बंगालकडे वळली आहे. प्रत्येक राज्यातील विधानसभेत आमदार पाठवून ओवेसी आपला पक्ष मजबूत करताना दिसत आहेत. त्यातच, भाजपला पराभूत करण्यासाठी आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत युती करण्याचा प्रस्ताव ओवेसींनी दिला आहे. ‘नवभारत टाइम्स’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

निवडणूकपूर्व युती करुन एकत्र ताकदीने रिंगणात उतरण्याचा ओवेसींचा मानस आहे. मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तर दिनाजपूर यासारख्या अल्पसंख्याक मतदारसंघांवर ओवेसींची नजर आहे. त्यामुळे सत्ताधारी तृणमूलचे बळ वापरुन मुस्लिमबहुल भागावर एमआयएम लक्ष केंद्रित करु शकतं.

ममतांकडून ओवेसींचा ‘उपरे’ असा उल्लेख

विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच ओवेसींना ‘उपरे’ म्हणत अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. अशात हातमिळवणी करायची झाल्यास त्यांना तात्विक तडजोड करावी लागेल.

प. बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात मुख्य लढत मानली जाते. काँग्रेस आणि डाव्यांचे आव्हानही ममतांसमोर आहे. परंतु ओवेसी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले, तर त्याचा फटकाही ममता बॅनर्जींना बसू शकतो.

तृणमूलची मतं खाण्यासाठी भाजपने एमआयएमला बळ दिल्याचा आरोप तृणमूल खासदार सौगता रॉय यांनी केला होता. तर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी एमआयएम भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप करत ओवेसींवर मतांचे ध्रुवीकरण केल्याचा घणाघात केला होता.

प. बंगालमध्ये राजकीय स्थिती काय?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसने (Trinmool Congress) 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44 , डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता. (MIM proposes pre poll alliance with TMC for West Bengal Election 2021)

बिहारमध्ये पाच जागा खिशात

“पाच वर्षांपूर्वी एमआयएम बिहारमध्ये एकूण 6 जागांवर निवडणूक लढला होता. त्यावेळी आम्ही सर्व जागांवर हरलो होतो. आमच्या पाच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. त्यानंतर आम्ही मेहनत घेतली. बिहारच्या जनतेशी आम्ही संवाद आणि चर्चा करत राहिलो. त्यानंतर आमच्या मेहनतीला फळ मिळाले. यावर्षी आम्ही 5 जागांवर विजयी झालो. तसेच यापुढेही आणखी मेहनत घेणार असून जनतेसमोर आमची भूमिका मांडणार ” असे ओवैसी निकालानंतर म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी भाजपचा खास प्लॅन; ‘हे’ पाच नेते गेमचेंजर ठरणार?

बिहारनंतर एमआयएम पश्चिम बंगालमध्ये निवडणुका लढणार? असदुद्दीन ओवैसी यांचे संकेत

(MIM proposes pre poll alliance with TMC for West Bengal Election 2021)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.