कोरोनाचा धोका वाढला, आरोग्य विभागाने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आरोग्य विभागाने आता नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. लोकांना आजारांपासून दूर राहण्यासाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा धोका वाढला, आरोग्य विभागाने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 6:44 PM

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूची ( Corona Virus ) लाट पुन्हा एकदा थैमान घालत आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने आता यंत्रणा देखील अलर्ट झाल्या आहेत. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता फ्लूचेही अनेक रुग्ण समोर येत आहेत, जे दिवसेंदिवस जीवघेणे ठरत आहेत. सर्वसामान्यांच्या आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक नवी अॅडव्हायजरी जारी केली आहे. ज्यामध्ये कोरोना काळात पाळण्यात आलेल्या नियमांचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून ( ministry of health ) अशी देखील माहिती मिळत आहे की, पुढील महिन्याच्या 10 आणि 11 एप्रिल रोजी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आपल्या देशातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये त्यासंबंधीच्या सर्व सुविधा, कर्मचारी आणि औषधांचा साठा तपासण्यात येणार आहे. याआधीही शेजारील देश चीनमध्ये कोरोनाची भयानक लाट असताना भारतात अशा प्रकारचे मॉक ड्रिल करण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालय 27 मार्च रोजी दुपारी 4.30 वाजता राज्य सरकारांशी चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहे. या बैठकीत मॉक ड्रिलशी संबंधित सर्व माहिती दिली जाणार आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सूचना काय ?

  1. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास सांगितले आहे. विशेषत: आजारी व्यक्ती आणि वृद्धांनी विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे.
  2. सर्व आरोग्य केंद्रांवर डॉक्टर, रुग्ण आणि तेथील कर्मचाऱ्यांना मास्क घालावे लागते. याद्वारे विषाणूचा प्रसार नियंत्रित केला जाऊ शकतो.
  3. बंद ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आवश्यक असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
  4. लोकांना खोकताना आणि शिंकताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. जेव्हाही तुम्ही शिंकाल किंवा खोकता तेव्हा तुमचे तोंड स्वच्छ रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
  5. अॅडव्हायझरीमध्ये हात स्वच्छ ठेवण्यास सांगितले आहे. ही सुविधा उपलब्ध नसल्यास लोकांनी आपले हात वारंवार धुवावे आणि स्वच्छता ठेवावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
  6. अॅडव्हायझरीमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांनाही असे न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  7. अॅडव्हायझरीमध्ये असे म्हटले आहे की, जर तुम्हाला कोरोना व्हायरस किंवा फ्लूची सुरुवातीची लक्षणे दिसत असतील, तर लगेच स्वतःची चाचणी करा.
  8. मंत्रालयाने म्हटले आहे की जर तुम्हाला फ्लू किंवा कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर इतर लोकांना भेटू नका.
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.