AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेन्शन स्कीममध्ये पैसे गुंतवताय; मोदी सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सध्याच्या घडीला राष्ट्रीय पेन्शन योजनेतून 2 लाखांपर्यंतची रक्कम काढता येऊ शकते. | Pension scheme

पेन्शन स्कीममध्ये पैसे गुंतवताय; मोदी सरकार 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
| Updated on: May 19, 2021 | 11:56 AM
Share

नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटामुळे देशातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे आता मोदी सरकार नागरिकांच्या हातात पैसा खेळता कसा राहील, यासाठी विविध उपाययोजना राबवताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार पेन्शन योजनेत (Pension Scheme) पैसे गुंतवणाऱ्या लोकांच्यादृष्टीने मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. (Modi govt is planning to extend withdraw money limit in pension fund)

सध्या कोरोनाच्या संकटामुळे अनेकांना आर्थिक चणचण जाणवत आहे. तसेच ज्या वित्तीय योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यामधूनही विशेष उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे आता मोदी सरकार आता पेन्शनधारकांना त्यांच्या फंडातील पूर्ण पैसे एकरकमी देण्याचा विचार करत आहे. जेणेकरून हे पैसे त्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवता येतील.

सध्याच्या घडीला राष्ट्रीय पेन्शन योजनेतून 2 लाखांपर्यंतची रक्कम काढता येऊ शकते. त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास ग्राहकांना केवळ 60 टक्केच वाटा काढता येतो. तर 40 टक्के योगदान हे सरकारकडून दिले जाते.

एकरकमी पैसे काढता येणार

सूत्रांच्या माहितीनुसार, पेन्शन नियामक, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण सध्या राष्ट्रीय पेन्शन स्कीमच्या ग्राहकांना फायदेशीर पर्याय उपलब्ध करुन देण्याचा विचार करत आहे. त्यानुसार ग्राहक पाच लाखांपर्यंतचा कॉर्पस रक्कम एकत्र काढू शकतात.

मर्यादा वाढवण्याचा विचार

पेन्शन फंडातील पैसे काढण्याची मर्यादा वाढवल्यास ग्राहकांना त्याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे वेळ पडल्यास ग्राहकांना पैसे मिळू शकतात.

व्यवहार डिजिटल होणार

पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी केल्यानंतर ती सेंट्रल अकाऊंटिग ऑफिस किंवा बँकेत पोहोचली नाही तर पुढील प्रक्रिया कंट्रोल जनरल ऑफ अकाऊंटसकडून (CGA) पूर्ण केली जाईल. CGA संबंधित पेन्शन प्रोसेसिंग सेंटर आणि बँकेला पुढील निर्देश देईल. हे सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने पार पडतील.

संबंधित बातम्या:

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, एटीएममध्ये जाण्याआधी जाणून घ्या नवा नियम

Flipkart Electronic sale : सॅमसंग, रियलमी आणि पोकोच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट

Income Tax: गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी पाळा आणि 40 हजारापर्यंत टॅक्स वाचवा

(Modi govt is planning to extend withdraw money limit in pension fund)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.