अमेरिका, रशियात नाही, या मुस्लिम देशांमध्ये राहतात सर्वाधिक भारतीय; 99 टक्के लोकांना…
Indian citizen in muslim country: मुस्लिम देश पण भारतीय नागरकांची संख्या मोठी... या मुस्लिम देशांमध्ये राहतात सर्वाधिक भारतीय; 99 टक्के लोकांना...

भारत जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. कोट्यवधी लोकं भारतात राहतात. पण फक्त भारतातच नाही तर, अन्य देशांमध्ये भारतीयांची संख्या फार मोठी आहे. यामध्ये अनेक मुस्लिम देश देखील आहेत. जिथे भारतीयांची संख्या खूप जास्त आहे. नोकरी, व्यवसाय किंवा चांगल्या जीवनाच्या शोधात, लाखो भारतीय आखाती देशांसह अनेक मुस्लिम देशांमध्ये स्थायिक झाले आहेत.
भारतीय नागरिक इतर देशातील अर्थव्यवस्थेचा देखील फार मोठा आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आखाती देशांमध्ये राहणारे भारतीय हे फक्त कामगार नाहीत तर, मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवरही आहेत. यमनपासून कुवेतपर्यंत कोणत्या मुस्लिम देशांमध्ये सर्वाधिक भारतीय राहतात जाणून घेऊ…
बहुतेक भारतीय या मुस्लिम देशांमध्ये राहतात
सौदी अरेबिया: बहुतेक भारतीय सौदी अरेबियामध्ये राहतात. सुमारे 26 लाख भारतीय येथे स्थायिक आहेत. येथे मोठ्या संख्येने कामगार, इंजीनियर, डॉक्टर आणि व्यावसायिक राहतात. तेथील तेल उद्योग आणि बांधकाम क्षेत्रात भारतीयांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सौदी सरकारच्या अनेक विभागांमध्येही भारतीय काम करतात.
संयुक्त अरब अमिराती : युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिराती हे भारतीय स्थलांतरितांसाठी दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं ठिकाण आहे. येथे सुमारे 34 लाख भारतीय राहतात. दुबई आणि अबू धाबी सारख्या शहरांमध्ये भारतीय मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
कुवेत : कुवेतमध्येही भारतीयांची संख्या बरीच आहे. येथे सुमारे 10 लाख भारतीय राहतात. त्यापैकी मोठ्या संख्येने टेक्नीशियन, ड्रायव्हर आणि हेल्पर्स आहेत. अनेक भारतीय येथे लहान दुकाने आणि व्यवसाय देखील करतात. विशेषतः केरळ आणि तामिळनाडूमधील लोकांची संख्या जास्त आहे.
ओमान : ओमानमध्ये सुमारे 8 लाख भारतीय राहतात. येथील बहुतेक लोक बांधकाम, वाहतूक आणि किरकोळ विक्री क्षेत्रात काम करतात. मस्कतसारख्या शहरांमध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. भारतीय शाळा, मंदिरे आणि सांस्कृतिक संस्था देखील येथे आहेत.
कतार : कतारमध्ये सुमारे 7 लाख भारतीय स्थायिक आहेत. फुटबॉल विश्वचषकाच्या तयारीदरम्यान भारतातून मोठ्या संख्येने कामगार येथे गेले होते. परंतु याशिवाय, आयटी, बँकिंग आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रात भारतीय मोठ्या संख्येने काम करत आहेत.
बहरीन : बहरीनमध्ये सुमारे 3.5 लाख भारतीय राहतात. येथे भारतीयांचा मोठा समुदाय आहे, ज्यामध्ये लहान दुकानदारांपासून ते मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यवसायिकांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. बहरीनची आर्थिक रचना मोठ्या प्रमाणात भारतीय कामगारांवर अवलंबून आहे.
यमन : यनममध्ये भारतीयांची संख्या इतर आखाती देशांपेक्षा कमी आहे, परंतु तेथेही सुमारे 3 लाख भारतीय राहतात. येथील बहुतेक लोक व्यापार, किरकोळ विक्री आणि सेवा क्षेत्राशी संबंधित आहेत.
