AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंधिया घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या हाती येणार एमपीसीएची सूत्रे, 2 सप्टेंबरला होणार घोषणा

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (एमपीसीए) नवीन अध्यक्षपदाची निवडणूक 2 सप्टेंबर रोजी इंदोरमधील होळकर स्टेडियमवर होणार आहे, ज्यामध्ये प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा होईल आणि त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.

सिंधिया घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या हाती येणार एमपीसीएची सूत्रे, 2 सप्टेंबरला होणार घोषणा
सिंधिया घराण्याची तिसरी पिढीImage Credit source: social media
| Updated on: Aug 18, 2025 | 2:25 PM
Share

मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएनशला (एमपीसीए) लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे, ही जबाबदारी सिंदिया घराण्याच्या तिसऱ्या पिढीकडे सोपवण्यात येऊ शकते. दोन सप्टेंबर रोजी इंदोरमध्ये होणाऱ्या एजीएममध्ये महानआर्यमन सिंधिया यांच्या नावाची घोषणा निश्चित मानली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशन (जीडीसीए) चे उपाध्यक्ष आणि एमपीएलचे चेअरमन महानआर्यमन सिंधिया हे यावेळी अध्यक्षपदासाठी एकमेव दावेदार आहेत, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. महान आर्यमन सिंधिया सध्या ग्वाल्हेर क्रिकेट असोसिएशनमध्ये उपाध्यक्षपदाची भूमिका बजावत आहेत.

एमपीसीएशी निगडीत अधिकारी आणि  ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मेहता यांच्यासह अनेक सदस्य इंदोरमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले आहेत. या समारंभात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया देखील सहभागी होणार आहेत.

इंदौरमध्ये 2 सप्टेंबरला होणार निवडणूक

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (एमपीसीए) नवीन अध्यक्षपदाची निवडणूक 2 सप्टेंबर रोजी इंदोरमधील होळकर स्टेडियमवर होणार आहे, ज्यामध्ये प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा होईल आणि त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. याआधी, आज, म्हणजे 18 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचा वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ इंदूरमधील ब्रिलियंट सेंटर येथे होणार आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया देखील सहभागी होतील. त्यानंतरच निवडणूक प्रक्रिया सुरू होईल, ज्यामध्ये महानआर्यमन सिंधिया यांचा दावा सर्वात मजबूत मानला जात आहे. यासाठीही सिंधिया यांच्या टीमकडून काम सुरू झाले आहे, त्यामुळे सर्वांच्या नजरा या निवडणुकीकडे लागल्या आहेत.

वडील आणि आजोबा होते अध्यक्ष

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनमध्ये सिंधिया कुटुंबाचा दबदबा आहे, कारण सिंधिया कुटुंबाच्या दोन पिढ्यांनी येथे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत माधवराव सिंधिया यांनी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दीर्घकाळ सांभाळली, तर ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील एमपीसीएचे अध्यक्ष होते. अशा परिस्थितीत, जर महानआर्यमन सिंधिया हे देखील एमपीसीएचे अध्यक्ष झाले, तर सिंधिया कुटुंबातील तिसरी पिढी ही जबाबदारी घेऊ शकते. आर्यमन सिंधिया सध्या जीडीसीएचे उपाध्यक्ष आणि मध्य प्रदेश प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.