AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुवाहाटी एअरपोर्टवर मुंबईचे प्रवासी अडकले; संतप्त प्रवाशांचा विमानतळावरच ठिय्या

गुवाहाटीहून मुंबईला येणारं विमान ऐनवेळी रद्द झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. शनिवारी संध्याकाळी गुवाहाटीहून मुंबईला येणारं अकासा एअरलाइन्सचं विमान ऐनवेळी रद्द करण्यात आलं. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी एअरपोर्टवरच ठिय्या केलं.

गुवाहाटी एअरपोर्टवर मुंबईचे प्रवासी अडकले; संतप्त प्रवाशांचा विमानतळावरच ठिय्या
Akasa AirImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 22, 2025 | 9:46 AM
Share

गुवाहाटीहून मुंबईला येणारं अकासा एअरलाइन्सचं विमान ऐनवेळी रद्द झाल्याने मुंबईला येणारे शेकडो प्रवासी शनिवारी गुवाहाटी विमानतळावरच अडकून पडले. यावेळी एअरलाइन्सने कोणतीही जबाबदारी न घेतल्याचा आरोप करत संतप्त प्रवाशांनी गुवाहाटी विमानतळावरच ठिय्या आंदोलन केलं. गुवाहाटीहून मुंबईला येण्यासाठी संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांचं अकासा एअरलाइन्सचं विमान आहे. या विमानाने येण्यासाठी गुवाहाटीला गेलेले मुंबईकर प्रवासी शनिवारी दुपारीच विमानतळावर दाखल झाले. परंतु ऐनवेळी विमान रद्द झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

सुरुवातीला हवामान खराब आहे, तसंच इतर तांत्रिक कारणं देत विमान उशिराने असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. मात्र रात्री साडेआठ वाजेपर्यंत वाट पाहिल्यानंतरही विमान उपलब्ध होत नसल्याने अखेर प्रवाशांचा संयम सुटला आणि अकासा एअरलाइन्सने त्यांना विमान रद्द झाल्याची माहिती दिली. पायलट आणि केबिन क्रू नसल्यामुळे आता उड्डाण होऊ शकत नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली. यावर प्रवाशांनी संताप व्यक्त करताच आजची रात्र तुमची हॉटेलमध्ये सोय करतो आणि उद्या सकाळच्या विमानाने तुम्हाला मुंबईला पाठवलं जाईल, असं प्रवाशांना सांगण्यात आलं. मात्र यावरही अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त करत थेट विमानतळातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यावर एअरलाइन्स स्टाफ आणि सीआयएसएफने प्रवाशांची समजूत काढत त्यांना सकाळच्या विमानाने जाण्याची विनंती केली आणि सकाळी साडेआठ वाजताच्या विमानाने हे प्रवासी अखेर मुंबईला रवाना झाले.

गेल्या काही दिवसांत विमानप्रवासाबद्दलच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनसाठी निघालेलं एअर इंडियाचं विमान उड्डाणाच्या अवघ्या काही तासांतच कोसळलं होतं. या दुर्घटनेत विमानातील फक्त एक प्रवासी सोडता बाकी सर्वांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर एअर इंडियाच्या विमानप्रवासाबद्दल इतरही काही तक्रारी समोर आल्या. काही ठिकाणी उड्डाणं अचानक रद्द करण्यात आली. अशातच आता अकासा एअरच्या या घटनेमुळे प्रवाशांच्या मनात संताप निर्माण झाला. उड्डाण रद्द झाल्याची माहिती ठराविक वेळेआधी न दिल्याने आणि ऐनवेळी प्रवाशांची गैरसोय झाल्याने अनेकांनी एअरपोर्टवरच ठिय्या केलं. त्यानंतर अकासा एअरकडून प्रवाशांची सोय हॉटेलमध्ये करण्यात आली.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.