Delhi Crime: जॅकेट परत केले नाही म्हणून मित्राची हत्या, दिल्लीतील धक्कादायक घटना

Delhi Crime: जॅकेट परत केले नाही म्हणून मित्राची हत्या, दिल्लीतील धक्कादायक घटना
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू

संतोष हा मित्रांसोबत 25 डिसेंबर रोजी घरातून गेला होता. मात्र तो परत घरी परतलाच नाही. म्हणून त्याच्या आईने 26 डिसेंबर रोजी संतोष बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. संतोषच्या आईच्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरु केला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 06, 2022 | 6:49 PM

मंगोलपुरी : घालण्यासाठी घेतलेले जॅकेट परत केले नाही म्हणून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील मंगोलपुरी येथे घडली आहे. संतोष अशे मयत तरुणाचे नाव आहे. संतोषच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. राजकुमार, जावेद आणि हर्षू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी हत्येनंतर संतोषचा मृतदेह नाल्यात फेकून दिला होता.

25 डिसेंबरपासून बेपत्ता होता संतोष

संतोष हा मित्रांसोबत 25 डिसेंबर रोजी घरातून गेला होता. मात्र तो परत घरी परतलाच नाही. म्हणून त्याच्या आईने 26 डिसेंबर रोजी संतोष बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. संतोषच्या आईच्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरु केला. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी जवळपास पाच राज्यांमध्ये 4500 किलोमीटरहून अधिक परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र संतोषचा कुठेच थांगपत्ता लागला नाही.

संतोष हा त्याच्या तीन मित्रांसोबत गेला होता आणि संतोष बेपत्ता झाल्यापासून हे तिघे फरार असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. तपासादरम्यान असे आढळून आले की, आरोपी नातेवाईकाला भेटण्यासाठी कानपूरला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेले होते. यानंतर एक टीम तेथे पोहोचली. तेथे गेल्यावर आरोपी कानपूरला पोहोचले नसल्याचे कळले.

गुजरातमधून तिन्ही आरोपींना घेतले ताब्यात

दरम्यान एक संशयित गयामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे एक पथक पाठवण्यात आले. तोपर्यंत तो गया सोडून गेला होता. तो गया येथून त्याच्या स्थानिक मित्रासोबत निघाल्याचे कळले. दोघांचे लोकेशन आग्रा येथे आढळून आले. त्यांना रोखण्यासाठी तातडीने एक पथक आग्रा येथे रवाना करण्यात आले, मात्र संशयित राजस्थान आणि त्यानंतर गुजरातकडे निघाले. ताबडतोब एका टीमला तेथे जाण्यास सांगण्यात आले. पथकाने रेल्वे मार्ग ट्रेस केला. अखेर तिन्ही आरोपींना पकडून गुजरातमधील गांधीधाम येथून दिल्लीत आणण्यात आले. सर्व जण वेगवेगळ्या कंपनीत काम करत होते. पोलीस चौकशीत आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. (Murder of a friend for not returning his jacket, shocking incident in Delhi)

इतर बातम्या

Pune crime | ‘या’ गुन्हयांतर्गत अंर्तगत रवींद्र बर्‍हाटेला चतु:श्रृंगी पोलिसांनी केली अटक

Bihar Double Murder : आधी गरोदर पत्नी आणि 3 वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला पट्टी बांधली, मग बेडला बांधले आणि जिवंत जाळले; वाचा बिहारमध्ये नेमके काय घडले?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें