AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नक्षलवाद्यांकडून बेपत्ता जवान राकेश्वर सिंगचा फोटो प्रसिद्ध, सुटकेसाठी ठेवली ‘ही’ अट

सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमधील राकेश्वर सिंग या जवानाचा फोटो नक्षलवाद्यांनी शेअर केला आहे. Rakeshwar Singh

नक्षलवाद्यांकडून बेपत्ता जवान राकेश्वर सिंगचा फोटो प्रसिद्ध, सुटकेसाठी ठेवली 'ही' अट
राकेश्वर सिंग
| Updated on: Apr 07, 2021 | 1:00 PM
Share

रायपूर : देशाला हदरवणाऱ्या छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 22 जवान शहीद झाले होते. सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमधील राकेश्वर सिंग या जवानाचा फोटो नक्षलवाद्यांनी शेअर केला आहे. जवानाचा फोटो शेअर करताना तो सुरक्षित असल्याचं ही सांगण्यात आलं आहे. नक्षलवाद्यांनी त्याच्या सुरक्षित सुटकेसाठी त्यांनी एक अट ठेवली होती. (Naxals released picture of kidnapped CRPF Jawan Rakeshwar Singh)

सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमधील राकेश्वर सिंग या जवानाचा फोटो नक्षलवाद्यांनी शेअर केला आहे.

बेपत्ता जवानाच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांची अट काय?

छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांनी स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचं सांगितलंय. तसेच त्याची सुटका व्हावी यासाठी एक अट समोर ठेवलीय. या अटीनुसार जवानाने सुटकेनंतर सुरक्षा दलात काम करु नये. ही नोकरी सोडून इतर कोणतंही काम करावं, अशी भूमिका नक्षलवाद्यांनी घेतलीय. नक्षलवाद्यांच्या या भूमिकेमागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

“नक्षलवाद्यांची मागणी पूर्ण करा, पण माझ्या पतीची सुटका करा”

दुसरीकडे जवान राकेश्वर सिंह यांच्या पत्नीने छत्तीसगड सरकारकडे आपल्या पतीची सुटका करण्याची विनंती केलीय. नक्षलवाद्यांची मागणी मान्य करा आणि पतीची सुटका करा, अशी भावना या जवानाच्या पत्नी मिनू मनहस यांनी व्यक्त केलीय.

जवानाचे वडील सीआरपीएफमध्ये असताना शहीद

जवान राकेश्वर सिंह यांचे वडील देखील सीआरपीएफमध्ये होते. ते देशासाठी लढताना एका मोहिमे दरम्यानच शहीद झाले होते. राकेश्वर यांच्या कुटुंबात त्यांच्याशिवाय आई, पत्नी आणि एक लहान मुलगी आहे.

हेही वाचा :

Chhattisgarh Naxal Attack : नक्षलवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, ‘बलिदान व्यर्थ जाणार नाही’ शाहांचा गर्भित इशारा

Chhattisgarh Naxal attack : एकाच हातावर दोन गोळ्या लागल्या, तरीही वीर जवान भिडला, कमांडरची डॅशिंग कहाणी

नक्षलवाद्यांविरोधात आता ‘ऑपरेशन प्रहार-3’; ‘हे’ 8 नक्षली कमांडर सुरक्षा दलाच्या रडारवर

(Naxals released picture of kidnapped CRPF Jawan Rakeshwar Singh)

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.