दिल्लीत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा, गोल्डन हॉस्पिटलमध्ये 20 जण दगावले

दिल्लीतल्याच बत्रा आणि सर गंगा राम हॉस्पिटलमध्येही काही वेळ पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा असल्याचं वृत्त आहे. (Delhi Jaipur Golden Hospital 20 Patient died due to oxygen shortage)

दिल्लीत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा, गोल्डन हॉस्पिटलमध्ये 20 जण दगावले
Oxygen Shortage

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचं संकट मोठं होताना दिसत आहे. कारण ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन मोठा तुटवडा पडतो आहे. दिल्लीच्या जयपूर गोल्ड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे 20 रुग्णांचा मृत झाल्याचं वृत्त आहे. दिल्लीतल्याच बत्रा आणि सर गंगा राम हॉस्पिटलमध्येही काही वेळ पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा असल्याचं वृत्त आहे.  (Delhi Jaipur Golden Hospital 20 Patient died due to oxygen shortage)

जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये मृत्यूचं तांडव

जयपूर गोल्डन हॉस्पिटलचे एमडी डॉ. डी के बलूजा यांनी दावा केलाय , काल रात्री ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर असलेल्या 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीचच आणखी एक हॉस्पिटल सरोजमध्येही ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळेच नव्या रुग्णांना भरती करत नसल्याचं तसंच आहे. त्यांना डिस्चार्ज देत असल्याचं हॉस्पिटलनं म्हटलं आहे.

बत्रात 300 पेक्षा जास्त जीव टांगणीला

दिल्लीतल्या बत्रा हॉस्पिटलचे एमडी डॉक्टर एसीएल गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार सकाळी 7 वाजता हॉस्पिटलमधलं ऑक्सिजन संपलं होतं. गुप्ता म्हणतात की, आम्हाला रोज 7 हजार लीटर ऑक्सिजनची गरज पडते आणि पाठवलं गेलं आहे फक्त 500 लीटर , तेही काही वेळातच संपेल. स्थिती जशास तशी आहे. 300 पेक्षा जास्त लोकांचा जीव टांगणीला आहे. यात 48 जण आयसीयूत भरती आहेत. त्यांचं काय होणार हा मोठा सवाल आहे. लवकरात लवकर ऑक्सिजन पुरवणं गरजेचं आहे. (Delhi Jaipur Golden Hospital 20 Patient died due to oxygen shortage)

संबंधित बातम्या : 

लॉकडाऊनमुळे सुट्टी कॅन्सल; सहकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच उरकली महिला कॉन्स्टेबलची हळद

मोदींच्या ‘हार्वर्डपेक्षा हार्डवर्क’ वक्तव्यावर टीकेची झोड, गुहा म्हणतात, मोदी स्वत:ला तज्ञांपेक्षा मोठं समजतात!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI