Scania Bus | मुलीच्या लग्नासाठी स्वीडिश कंपनीची आलिशान बस गिफ्ट, नितीन गडकरींनी आरोप फेटाळले

स्कॅनिया कंपनीशी नितीन गडकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे काहीही देणेघेणे नाही, असे गडकरींतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (Nitin Gadkari Scania luxury bus)

Scania Bus | मुलीच्या लग्नासाठी स्वीडिश कंपनीची आलिशान बस गिफ्ट, नितीन गडकरींनी आरोप फेटाळले
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 2:49 PM

मुंबई : ‘स्कॅनिया’ (Scania) या स्वीडिश बस कंपनीने मुलीच्या लग्नासाठी आलिशान बस गिफ्ट (Scania luxury bus row) दिल्याचे आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी फेटाळले आहेत. 2016 मध्ये गडकरींच्या मुलीच्या लग्नात स्वीडिश कंपनीने बस भेट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र हे आरोप प्रतिमा मलीन करणारे आणि निराधार असल्याचा दावा गडकरींनी केला आहे. (Nitin Gadkari clarification on Scania luxury bus row gift for Daughter’s wedding)

“नितीन गडकरी यांच्या मुलाबरोबर जवळचे संबंध असलेल्या ‘स्कॅनिया’ या स्वीडिश ट्रक आणि बस निर्मिती करणाऱ्या कंपनीने नोव्हेंबर 2016 मध्ये लक्झरी बस दिली, हे माध्यमांनी दिलेलं वृत्त बदनामीकारक, खोटं आणि निराधार आहे” असं स्पष्टीकरण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग कार्यालयाने दिले. ही बस गडकरींच्या कन्येच्या विवाहावेळी वापरल्याच्या बातम्या म्हणजे केवळ माध्यमांचा कल्पनाविलास आहे, असंही यात म्हटलं आहे.

गडकरींच्या लेकीच्या लग्नासाठी विनामोबदला बस

रॉयटर्स या न्यूज एजन्सीने बुधवारी एका स्वीडिश माध्यमाच्या वृत्ताचा हवाला देत म्हटले होते की, “‘स्कॅनिया’ने विशेष सुविधांनी युक्त असलेली एक बस नितीन गडकरींना दिली होती. ती बस त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी वापरली गेली आणि त्यासाठी संपूर्ण मोबदलाही घेतला गेला नाही.”

रस्ते वाहतूक कार्यालयाचे स्पष्टीकरण काय

“बसच्या खरेदी-विक्रीशी नितीन गडकरी यांचा काहीही संबंध नाही किंवा बसच्या खरेदी किंवा विक्रीशी संबंधित असलेल्या कोणत्याही फर्म किंवा व्यक्तीशी त्यांचे काही संबंध नाहीत” असं केंद्रीय रस्ते वाहतूक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. स्कॅनिया बस व्यवहार हा संबंधित कंपनीचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे त्या कंपनीचे अधिकृत स्टेटमेंट येईपर्यंत मीडियाने वाट पाहावी, असंही स्पष्टीकरणात म्हटलं आहे. (Nitin Gadkari clarification on Scania luxury bus row gift for Daughter’s wedding)

सुदर्शन हॉस्पिटॅलिटी कंपनीला बसची विक्री

“स्कॅनिया मेट्रोलिंक बस ही ट्रान्सप्रो मोटर्स या बंगळुरुस्थित एका डीलरला विकली होती, जी नंतर सुदर्शन हॉस्पिटॅलिटी नावाच्या कंपनीला विकली गेली. सुदर्शन हॉस्पिटॅलिटी नागपूरच्या बाहेर आहे. गडकरींना वैयक्तिक वापरासाठी कुठलीही बस दिली नाही, असं स्पष्टीकरण स्कॅनिया कंपनीने दिल्याचं वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलं आहे.

नागपूर महापालिकेशी करारामुळे संशय

हरित वाहतुकीबाबत जागृतीसाठी नागपुरात स्कॅनियाची एथेनॉलवर चालणारी बस आणण्यात नितीन गडकरी अग्रणी होते. नागपूर महापालिकेला यासंबंधी पायलट प्रकल्प चालवण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यानंतर प्रशासनाने स्वीडिश कंपनीशी सामंजस्य करारही केला. परंतु हा नागपूर महापालिका आणि स्कॅनिया कंपनीतील आर्थिक व्यवहार होता, त्याच्याशी नितीन गडकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे काहीही देणेघेणे नाही, असे गडकरींतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

नितीन गडकरींचा बुलेटप्रुफ गाडीला रामराम; आता फक्त इलेक्ट्रिक कारने प्रवास

(Nitin Gadkari clarification on Scania luxury bus row gift for Daughter’s wedding)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.