AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor: संस्कृत श्लोक…ऑपरेशन सिंदूरचा लोगो अन् PM मोदींचा तो कडक संदेश…असीम मुनीर, शाहबाज शरीफची उडाली झोप

PM Modi on operation Sindoor first anniversary : पहलगाम हल्ल्याचा धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने पहिल्यांदाच मोठी कारवाई केली. पाकड्यांचा दहशतवादाचा बुरखा टराटरा फाटला. आता पंतप्रधान मोदींनी कडक संदेश दिला आहे.

Operation Sindoor: संस्कृत श्लोक...ऑपरेशन सिंदूरचा लोगो अन् PM मोदींचा तो कडक संदेश...असीम मुनीर, शाहबाज शरीफची उडाली झोप
ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 07, 2026 | 11:14 AM
Share

PM Modi on operation Sindoor first anniversary : भारताने पाकड्यांना आणि दहशतवाद्यांना पहलगाम हल्ल्याचा धडा शिकवला. भारतील सशस्त्र दलाने पहिल्यांदाच पाकिस्तानच्या आत घुसत दहशतवादी तळ नष्ट केली. या कारवाईने पाकिस्तानचे जगभरात नाक कापल्या गेले. पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसीम मुनीर तर मेल्याहून मेले झाले. आज ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर डिस्प्ले छायाचित्र बदलवले. त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा लोगो लावला. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तराला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मोदींनी तिनही सशस्त्र दलांना सलाम केला. तर पाकिस्तानला थेट संदेश दिला.

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम हल्ला झाला होता. निरपराध पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. यामध्ये एका स्थानिकासह 26 जणांचा जीव गेला होता. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होऊ लागली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारती सशस्त्र दलाने पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात घुसून 9 दहशतवादी तळं उद्धवस्त केली. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी यमसदनाला पाठवण्यात आले. तर पाकिस्तानच्या लष्करी धावपट्ट्यांचेही मोठे नुकसान करण्यात आले.

7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. भारताने पाकिस्तानसह पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक मोहिम राबवली. त्यात लष्कर-ए-तैयब्बा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवादी तळांवर हल्ला चढवण्यात आला. भारतीय सशस्त्र दलाच्या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. त्यांचे तळाचे मोठे नुकसान झाले. पाक लष्कराला प्रत्युत्तराला संधी मिळाली नाही. तर सीमेवर त्यांनी जे ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागली, त्यामुळे पाकचे मोठे नुकसान झाले.

संस्कृत श्लोकातून थेट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स हँडलवर संस्कृत श्लोक शेअर केला. त्यात तीनही सशस्त्र दलांच्या शौर्याला त्यांनी सलाम केला. “उदीर्णमनसो योधा वाहनानि च भारत। यस्यां भवन्ति सेनायां ध्रुवं तस्यां जयं वदेत्…।” म्हणजे भारताच्या सशस्त्र दलाचे जवान ज्यांचे मनोबल उंच आहे आणि ते उत्साहीत आहेत. ज्यांच्याकडे चांगली वाहनं आणि शस्त्र आहेत, त्यांचा विजय हा निश्चित असतो. यातून पंतप्रधानांनी पाकिस्तानला मोठा संदेश दिल्याचे मानले जाते.

त्या लोकांना करारा जवाब

तर अजून एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कडक संदेश दिला. एका वर्षापूर्वी आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूरमधून अतुलनीय साहस दाखवले. अचूकता आणि शौर्याचे दर्शन घडवले. आपल्या सशस्त्र दलाने त्या लोकांना करार जवाब दिला आहे, ज्यांनी निरपराध भारतीयांवर हल्ला करण्याची हिंमत केली. संपूर्ण देश या सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करतो. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादा विरोधात भारताची रोखठोक प्रतिक्रिया आणि राष्ट्रीय सुरक्षेत कोणताच कसूर होणार नाही हे दाखवून दिल्याचे पंतप्रधान म्हणाले. तर तीनही सशस्त्र दलातील ताळमेळही यामुळे समोर आल्याचे कौतुक त्यांनी केले.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!