AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचे तीन तुकडे होणार?, भारताच्या जबरदस्त प्रहारनंतर डिफेन्स एक्सपर्ट्स काय म्हणतात?

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे मृत्यू झालेल्या दहशतवादी पाकिस्तानी झेंड्यात लपटलेले दिसले. तसेच त्यांच्या दफनविधीला लष्करचे अधिकारी देखील उपस्थित होते. यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे, असेही निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी म्हटले.

पाकिस्तानचे तीन तुकडे होणार?, भारताच्या जबरदस्त प्रहारनंतर डिफेन्स एक्सपर्ट्स काय म्हणतात?
Operation Sindoor
| Updated on: May 09, 2025 | 10:34 AM
Share

भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या दणक्यानंतर पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेले सर्व हल्ले भारतीय लष्कराने परतवून लावले आहेत. भारताने पाकिस्तानचे ड्रोन अन् क्षेपणास्त्रे निकामी केली आहेत. भारताचे ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानमधील परिस्थिती यासंदर्भात संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी माहिती दिली. निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी पाकिस्तानमधील परिस्थितीबद्दल ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना माहिती दिली.

निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी सांगितले की, पाकिस्तानने आगळीक केल्यामुळे आपल्याला पुन्हा पाकिस्तानवर हल्ले करावे लागले आहे. आपण केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराची हवाई यंत्रणा निकामी झाली आहे. पाकिस्तानची परिस्थिती पाहिल्यावर पुढील पाच दहा वर्षांत बलुचिस्तान हा पाकिस्तान मधून वेगळा होईल. तसेच सिंधू प्रांत देखील पाकिस्तानमधून वेगळा होईल. फक्त पंजाबच पाकिस्तान राहील, असा अंदाज निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केला.

पाकिस्तान सातत्याने भारताला पोकळ धमक्या देत आहेत. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे मृत्यू झालेल्या दहशतवादी पाकिस्तानी झेंड्यात लपटलेले दिसले. तसेच त्यांच्या दफनविधीला लष्करचे अधिकारी देखील उपस्थित होते. यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे, असेही निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी म्हटले.

पाकिस्तानचे पंतप्रधान कठपुतली

ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तान आता युद्धाकडे वाटचाल करत आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या हातात आता काही राहिले नाही. सर्व काही पाकिस्तानी लष्कराने हातात घेतले आहे. ड्रोननंतर आता क्षेपणास्त्र आणि फायटर जेटने देखील पाकिस्तानवर हल्ला होऊ शकतो. दहशतवाद्यांच्या दफनविधीला लष्कराचे अधिकारी उपस्थित राहतात. त्यांच्या मृतदेहाला पाकिस्तानचा ध्वज लपटलेला असतो. हे सर्व पुरावे आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ठेवू शकतो. त्यामुळे पाकिस्तानवर जगाने आर्थिक निर्बंध लादण्याची गरज आहे. तसेच पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून घोषित करण्याची आवश्यकता आहे, असे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी म्हटले.

विंग कमांडर शर्मा म्हणाले की, पाकिस्तानला गाझा बनवण्याची पूर्ण तयारी झाली आहे. आपण जो हल्ला केला तो पिन पॉइंट होता. यामुळे संयुक्त राष्ट्रसंघानुसार तो एक्ट ऑफ वॉर नाही. ऑपरेशन सिंदूर आम्ही दहशतवादी तळ नष्ट केल्यावर संपवले होते. परंतु त्यानंतर पाकिस्तानने हल्ला केला. त्याचे उत्तर देणे गरजेचे आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.