VIDEO: महाराष्ट्रासाठी गुजरातमधून ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना, स्वतः पीयूष गोयल यांच्याकडून माहिती

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी महाराष्ट्रासाठी गुजरातमधून ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाल्याची माहिती दिलीय.

VIDEO: महाराष्ट्रासाठी गुजरातमधून ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना, स्वतः पीयूष गोयल यांच्याकडून माहिती
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 8:11 PM

गांधीनगर : महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची संख्या नोंदवले जातेय. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. म्हणूनच राज्य सरकारकडून शक्य होईल तेथून ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडेही ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याची मागणी केलीय. त्यानंतर आता केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रासाठी गुजरातमधून ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाल्याची माहिती दिली (Oxygen express coming from Gujrat for Maharashtra amid Corona situation).

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “गुजरातमधील हापा येथून महाराष्ट्रातील कळंबोलीसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन एक ऑक्सिजन एक्स्प्रेस निघाली आहे. ही एक्स्प्रेस ट्रेन महाराष्ट्रातील ऑक्सिजनच्या उपलब्धतेला वाढवेल. त्यामुळे कोरोना विरुद्धची लढाई लढण्यास मदत होईल.”

5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजन उपलब्ध होणार

दरम्यान, याआधी पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपूरमध्ये दाखल झाली. विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या 7 (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे ऑक्सिजन एक्सप्रेस आली होती. त्यातील 3 टँकर नागपूरमध्ये तर उर्वरित नाशिकला देण्यात आलेत. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून 5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला होणार आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत रेल्वे मार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल असं केंद्र शासनाला सुचवलं होतं. त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजुरी दिली. यापुढील काळात ऑक्सिजनच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतर केंद्राची मदत

राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे ऑक्सिजनची मागणी केली. त्यानंतर रेल्वेकडून खास ऑक्सिजन एक्सप्रेस देण्यात आली आहे. महाराष्ट्राला विशाखापट्टणम, जमशेदपूर, राऊरकेला आणि बोकारो इथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.

हेही वाचा :

Video : ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास घाबरु नका, घरच्या घरी 1 मिनिटात हा उपाय करा

गडकरीसाहेब म्हणाले, विदर्भातील ऑक्सिजनचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा : अजित पवार

महाराष्ट्र दिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळण्याची चिन्हं, अजित पवारांचे संकेत, ग्लोबल टेंडर काढणार

व्हिडीओ पाहा :

Oxygen express coming from Gujrat for Maharashtra amid Corona situation

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.