AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कराची बंदरापासून इस्लामाबादपर्यंत…, भारताच्या प्रतिहल्ल्यामुळे संपूर्ण पाकिस्तान हादरला

karachi port: भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे चिडलेल्या पाकिस्तानने ८ आणि ९ मे च्या रात्री सीमेपलीकडून रात्रभर गोळीबार केला. क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे सात क्षेपणास्त्र भारताने पाडले आहे.

कराची बंदरापासून इस्लामाबादपर्यंत..., भारताच्या प्रतिहल्ल्यामुळे संपूर्ण पाकिस्तान हादरला
Sindoor
| Updated on: May 09, 2025 | 7:18 AM
Share

karachi port: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून भारतावर अयशस्वी हल्ल्याच्या प्रयत्न केला जात आहे. परंतु भारतीय लष्कराने पाकिस्तानला जोरदार उत्तर दिले आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे चिडलेल्या पाकिस्तानने ८ आणि ९ मे च्या रात्री सीमेपलीकडून रात्रभर गोळीबार केला. क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे सात क्षेपणास्त्र भारताने पाडले आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुरुवारी संध्याकाळी जम्मूच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानने डागलेले किमान आठ क्षेपणास्त्रे भारताच्या संरक्षण यंत्रणेने हवेत यशस्वीरित्या पाडली. दुसरीकडे भारतीय नौदलाने सागरी आघाडीवर पाकिस्तानला जोरदार उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानच्या कराची बंदराला लक्ष्य करून सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे कराची बंदराचे मोठे नुकसान झाले आहे.

भारतीय नौदलाने रात्रीच्या अंधारात कराची बंदरावर गुप्तपणे हल्ला केला. बंदरावर तैनात असलेल्या पाकिस्तानी नौदलाला सावरण्याची संधीही मिळाली नाही. भारताने एकामागून एक अनेक क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो आणि ड्रोन हल्ल्यांद्वारे कराची बंदराचे मोठे नुकसान केले. भारतीय नौदलाच्या हल्ल्याचा केंद्रबिंदू केवळ आर्थिक पायाभूत सुविधांवर नव्हता, तर पाकिस्तानी नौदलाची जहाजे, शस्त्रास्त्रे डेपो आणि टेहाळणी करणारी केंद्रे देखील पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. कराची बंदर हे पाकिस्तान नौदलाचा कणा मानले जाते आणि त्यावरील हा हल्ला त्यांच्या सामरिक सामर्थ्याला थेट आव्हान देतो.

पाकिस्तानच्या चिथावणीखोर कृतीला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानवरील अनेक शहरांमध्ये हल्ले केले. भारताने लाहोर, इस्लामाबाद, कराची, सियालकोट, बहावलपूर, पेशावर आणि कोटली येथे जलद प्रत्युत्तर कारवाई करून पाकिस्तानला योग्य उत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून पठाणकोट एअरबेसला लक्ष्य करत क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. परंतु भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने हे हल्ले परतवून लावले.

दरम्यान, पाकिस्तान सरकार आणि लष्कराकडून हल्ल्याबाबत कोणतेही स्पष्ट विधान करण्यात आलेले नाही. दुसरीकडे कराचीमधील स्फोटांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण पाकिस्तान अधिकृत पुष्टी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

Follow Us
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला.
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष.
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र.
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या.
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व.
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील.
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं.