AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावातील लोकांनी रातोरात घरदार सोडले होते, मिळाला होता शाप, काय आहे नेमके रहस्य ?

Kuldhara Village: कुलधारा गावाच्या भोवती गूढ कथा, इतिहास तसेच भुताटकीच्या कहाण्या गुंफलेल्या आहेत. हे गाव रातोरात ओसाड का झाले? यामागे काय या मागचे सत्य ?

या गावातील लोकांनी रातोरात घरदार सोडले होते, मिळाला होता शाप, काय आहे नेमके रहस्य ?
Kuldhara Village
| Updated on: May 30, 2026 | 6:29 AM
Share

Kuldhara Village: अनेकांना साहसी पर्यटनाची सवय असते. काही जण जंगलात भटकंती करायला जातात. तर काही जणा किल्ले पाहण्यासाठी किंवा एखाद्या निर्जन फारशा कोणाला माहिती नसलेल्या स्थळांना भेट देत असतात. जैसलमेरच्या जवळ असलेले कुलधरा गाव अशांसाठी एक चांगले डेस्टीनेशन होऊ शकते.थार वाळवंटाच्या दरम्यान वसलेले गाव त्याच्या रहस्यमयी कहाणी आणि खंडहरमुळे ओळखले जाते. हे गाव जैसलमेरपासून सुमारे १८ किमीवर वाळवंटात वसलेले आहे. कुलधारा भारतातील सर्वात रहस्यमयी गावापैकी एक मानले जाते.

कुलधरा गाव आधी निर्जन आणि ओसाड नव्हते येथे गावकरी राहात होते. या गावाशी संबंधित अनेक आख्यायिका प्रचलित आहे. स्थानिकांच्या मतानुसार १३ व्या शतकाच्या आसपास या गावाला पालीवाल ब्राह्मणांनी वसवले होते. हे लोक व्यापार आणि वाळवंटातही शेती करण्यासाठी खास ओळखले जात होते. या वेगळ्या प्रकारच्या शेतीमुळे त्यांची मोठी प्रगती झाली होती. हे गाव खूप निसर्गरम्य होते. येथील घरे देखील आखीव रेखीव होती. गावात पाण्याची व्यवस्था, विहिरी, बावड्या होत्या. एकेकाळी कुलधरा गावाचे लोक कष्ठ करुन सुखाने राहात होते.

नंतर अशी वेळ आली की गावाचे स्वरुपच बदलले. १८०० च्या आसपास हे गाव रिकामे झाले. वाळवंटात पाण्याची सर्वाधिक गरज असते. हळूहळू येथील विहीरी आटू लागल्या, त्यामुळे जगणे कठीण झाले.तसेच येथील शासकांनी गावकऱ्यांवर जुलमी कर लावले. त्यामुळे लोकांवर दबाव वाढला. काही लोकांचे म्हणणे आहे की भूकंपामुळे गावाचे नुकसान झाल्याने लोकांनी हे गाव सोडले.

कुलधरा गावाची आख्यायिका

कुलधरा गावातील सलीम सिंह नावाचा ताकदवान व्यक्तीला एका मुलीवर भाळला होता. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. परंतू गावकऱ्यांनी त्यास परवानगी नाकारली. त्यामुळे गावकऱ्यांनी या सलीम सिंह याच्या पुढे मान तुकवण्यापेक्षा हे गाव सोडणे पसंत केले. एकाच रात्री केवळ कुलधराच नव्हे तर आजूबाजूची गावे देखील खाली झाली. लोक अचानक गायब झाले आणि येथील जीवनगाडा देखील थांबला. जाण्याच्या आधी लोकांनी या जागेला शाप दिला होता की येथे कोणीही पुन्हा यायचे नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे गाव आजपर्यंत खाली आहे.

कुलधरा गावाच्या अख्यायिका

कुलधरा गावाच्या अनेक कहाण्या ऐकायला मिळतात. लोक म्हणतात की येथे रात्री अजब विचित्र आवाज येतात.येथील भीतीदायक सावल्या देखील फिरताना दिसत असतात. काही पॅरानॉर्मल्स ग्रुप्सने देखील येथे अजब अनुभव येत असल्याचा दावा केला जात आहे. परंतू स्थानिक लोकांचा या भूता प्रेतांच्या कहाणीवर विश्वास नाही. त्यांच्यासाठी या कहाण्याच कुलधराची खासियत आहे. येथील जागा खरोखरच हाँटेड ( भूताटकी ) असूही शकते किंवा नसूही शकते असे म्हटले जाते.

कुलधरा गावात केवळ ओसाड खंडर नाहीत.तर येथे तुम्ही जाऊन फिरु देखील शकता. जुन्या घरांच्या अनोखी शैलीची मजा घेऊ शकता. गावातील भित्तींवरील चित्र पाहू शकता. एकूणच काय तुम्ही तुमची फोटोग्राफीची हौस भागवू शकता. राजस्थान सरकार देखील या गावाचा विकास करण्यासाठी काम करत आहे. येथे काही काळात पर्यटकांसाठी कॅफे, आणि इतर सोयी देखील पाहायला मिळू शकतात.

येथे जायचे कसे ?

या गावात पोहचण्याचा थेट मार्ग नाही. जैसलमेरहून तुम्ही टॅक्सी करु शकता. किंवा लोकल टुर बुक करु शकता. येथे लोक डेझर्ट सफारीची योजना आखतात. कुलधरा केवळ भुताटकी वा रहस्यमय जागा नाही तर एक शांत, सुंदर आणि रंजक जागा देखील आहे. त्यामुळे पर्यटकांनी ती आकर्षित करत असते.

कुलधराच्या आजूबाजूला काय ?

कुलधरा गावाच्या आजूबाजूला देखील अनेक शानदार जागा पाहाण्यासारख्या आहेत. ज्यांचा समावेश तुम्ही तुमच्या ट्रीपमध्ये करु शकता. सम सँड ड्युन्स, खुरी गाव, जैसलमेर किल्ला, गडीसर तलाव, मोठी बाग आदी

Follow Us
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...