Petrol Diesel Price Hike | इंधन दरवाढ सुरुच, 16 दिवसात पेट्रोल प्रतिलिटर नऊ रुपयांनी महाग

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी 7 जूनपासून सुरु झालेली इंधन दरवाढ थांबायचं नाव घेत नाही (Petrol Diesel Price Hike continues on 16th Day)

Petrol Diesel Price Hike | इंधन दरवाढ सुरुच, 16 दिवसात पेट्रोल प्रतिलिटर नऊ रुपयांनी महाग

नवी दिल्ली : इंधनाच्या किमतीत सलग सोळाव्या दिवशी दरवाढ सुरुच आहे. पेट्रोल प्रतिलिटर 33 पैसे तर डिझेल 58 पैशांनी महाग झाले आहे. 16 व्या दिवशी किमती मध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या पंधरवड्यात पेट्रोल प्रतिलिटर तब्बल 9.21 रुपयांनी महाग झाले आहे. (Petrol Diesel Fuel Price Increase continues on 16th Day)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी 7 जूनपासून सुरु झालेली इंधन दरवाढ थांबायचं नाव घेत नाहीये. गेल्या दोन आठवड्यांपासून सलग इंधन दरवाढ सुरुच राहिल्याने सर्वसामान्य वाहनचालक पुरते त्रासून गेले आहेत.

पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 33 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव 79 रुपये 56 पैशांवर पोहोचला आहे. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 58 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलचे दर प्रतिलिटर 78 रुपये 85 पैसे झाले आहेत.

16 दिवसात इंधन किती महाग?

पेट्रोल प्रतिलिटर 9.21 रुपयांनी महाग
डिझेल प्रतिलिटर 8.57 रुपयांनी महाग

लॉकडाऊनच्या काळात इंधनाच्या विक्रीत प्रचंड घट झाली होती. त्यामुळे 16 मार्च ते 5 मे या कालावधीत देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर होते. या काळात कच्च्या तेलाच्या किमती मात्र वाढत होत्या. हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे.

हेही वाचा : इंधन दरवाढ ‘विदाऊट ब्रेक’ सुरुच, दहा दिवसात पेट्रोल-डिझेल किती महाग?

इंधनाच्या किमतीत उत्पादन शुल्क, स्थानिक कर, व्हॅट, अधिभार यांचा समावेश होती. त्यामुळे प्रत्यक्षात इंधनाचे दर ग्राहकांसाठी प्रचंड चढ्या प्रमाणात असतात. राज्य सरकारने या महिन्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या व्हॅटवरील अधिभार म्हणून प्रतिलिटर दोन रुपये वाढ केली होती. (Petrol Diesel Fuel Price Increase continues on 16th Day)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *