Petrol-Diesel Price Today | पेट्रोल 92 च्या पार, डिझेलचेही दर वाढले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

शुक्रवारी पेट्रोलच्या दरात तब्बल 23 ते 25 पैशांची वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या दरात 24 ते 27 पैशांची वाढ झाली आहे.

Petrol-Diesel Price Today | पेट्रोल 92 च्या पार, डिझेलचेही दर वाढले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
डिझेल
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 7:55 AM

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. या बदलतया दरांचा सामान्य माणसाच्या (Petrol-Diesel Price Today)रोजच्या खर्चावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे बदललेले दर जारी करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. पण, डोमेस्टिक बाजारात दोन दिवस स्थिरावलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. यापूर्वी, सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवस सतत पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली होती. (Petrol-Diesel Price Today).

शुक्रवारी पेट्रोलच्या दरात तब्बल 23 ते 25 पैशांची वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या दरात 24 ते 27 पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर 25 पैशांनी वाढले आहेत, मुंबईत 24 पैसे, कोलकात्यात 24 पैसे आणि चेन्नईत 22 पैशांनी वाढले आहेत

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, शुक्रावारी दिल्लीत पेट्रोलचा दर 85.45 रुपये प्रति लीटर इतका असेल. तर मुंबईत 92.04 रुपये प्रति लीटर असेल. तर कोलकात्यात पेट्रोलचा दर 86.87 रुपये प्रति लीटर असेल. तर दिल्लीत डिझेलचा दर 75.63 रुपये प्रति लीटर असेल. तर मुंबईत 82.40 रुपये प्रति लीटरने डिझेल विकलं जाईल. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर…

देशाच्या मुख्य शहरांमधील पेट्रोलचे दर

दिल्ली (Delhi Petrol Price Today): 85.45 रुपये प्रति लीटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 92.04 रुपये प्रति लीटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 86.87 रुपये प्रति लीटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today): 88.08 रुपये प्रति लीटर

नोएडा (Noida Petrol Price Today): 85.02 रुपये प्रति लीटर

मुख्य शहरांमधील डिझेलचे दर

दिल्ली (Delhi Diesel Price Today): 75.63 रुपये प्रति लीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today): 82.40 रुपये प्रति लीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 79.23 रुपये प्रति लीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today): 80.90 रुपये प्रति लीटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 76.08 रुपये प्रति लीटर

Petrol And Diesel Price Today

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे आजचे दर

कोल्हापूर –

पेट्रोल : 92 रुपये प्रति लीटर

डिझेल : 81.10 रुपये प्रति लीटर

नागपूर –

पेट्रोल : 92.31 रुपये लीटर

डिझेल : 81.80 रु रुपये लीटर

पुणे –

पेट्रोल : 91.71 रुपये लीटर

डिझेल : 80.83 रुपये लीटर

औरंगाबाद –

पेट्रोल : 92.50 रुपये लीटर

डिझेल : 83.37 रुपये लीटर

नाशिक –

पेट्रोल : 92.24 रुपये लीटर

डिझेल : 81.07 रुपये लीटर

जळगाव –

पेट्रोल : 92.74 रुपये लीटर

डिझेल : 82.07 रुपये लीटर

रायगड – खोपोली –

पेट्रोल : 91.89 रुपये लीटर

डिझेल : 81.02 रुपये लीटर

नंदुरबार –

पेट्रोल : 92.39 रुपये लीटर

डिझेल : 81.65 रुपये लीटर

पेट्रोलचे दर आवाक्याबाहेर जाण्याचं कारण काय?

राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांकी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90 च्या पार गेली आहे. तर डिझेलचे दर हे 80 रुपयांच्या पार गेले आहेत. मात्र, प्रक्रिया केल्यानंतर पेट्रोल पंपावर पेट्रोलचा मूळ दर हा 28.50 रुपये प्रति लीटर असते. तर डिझेलचा मूळ दर हा 29.52 रुपये प्रति लीटर असते. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. सरकार पेट्रोल आणि डिझेलवर त्याच्या मुळ किमतीच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारते.

सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात .

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?

मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.

संबंधित बातम्या :

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.