AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! विमानाचा भीषण अपघात, उड्डाण घेताच… ओडिशातील घटनेनं देशात खळबळ!

Plane Crash in Odisha : ओडिशातील राउरकेला हवाई तळापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर एक विमान कोसळले आहे. उड्डाण घेतात या विमानात तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे पायलटने आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला. या घटनेत पायलटला गंभीर दखापत झाली आहे.

मोठी बातमी! विमानाचा भीषण अपघात, उड्डाण घेताच... ओडिशातील घटनेनं देशात खळबळ!
Odisha Plane crashImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 10, 2026 | 3:34 PM
Share

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला होता. या विमान अपघातात 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. आता ओडिशातील राउरकेला हवाई तळापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर एक विमान कोसळले आहे. उड्डाण घेतात या विमानात तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे पायलटने आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला. या घटनेत पायलटला गंभीर दखापत झाली आहे. त्याला आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघात 6 जण जखमी झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ओडिशात विमान कोसळले

समोर आलेल्या माहितीनुसार भुवनेश्वरहून राउरकेलाला जाणाऱ्या नाईन सीटर विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर काही काळात तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. टेकऑफनंतर सुमारे 10 किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळले. हे विमान दुपारी 1:15 वाजता राउरकेला येथे उतरणार होते, मात्र त्यापूर्वीच त्याचे जालदाजवळ आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न झाला, मात्र यात पायलट गंभीर जखमी झाला आहे. ही घटना घडताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. विमानात अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. आता अघिकाऱ्यांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे.

एकूण सहा जण विमानात होते

समोर आलेल्या माहितीनुसार या विमानात एकूण 6 जण प्रवास करत होते. यात चार प्रवासी आणि कॅप्टन नवीन कडंगा आणि कॅप्टन तरुण श्रीवास्तव यांचा समावेश आहे. या घटनेत सर्व सहा जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातानंत या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर अग्निशमन दलाच्या तीन पथकांनी तातडीने बचावाला सुरुवात केली. स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनीही बचाव कार्यात मदत केल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले?

या विमान अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या विमानानेआपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला. विमान खूप खाली उतरले होते. त्यानंतर विमान पुढे गेले आणि कोसळले. आता या विमान अपघातानंतर, अधिकारी आता हा अपघात नेमका कसा घडला याचा तपास करत आहेत. या घटनास्थळाजवळ झाडे होती. जर विमान त्यात अडकले असते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र या अपघातातून सर्वजण बचावले आहेत.

सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल.
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे.
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर.
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल.
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित.
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी.
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका.
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा.