Donald Trump : एकाच दगडात दोन पक्षी; ट्रम्पच नाही तर चीनलाही मोदींचा मोठा इशारा, आता अमेरिकन-चीनी मालाची होणार होळी? दिले ते मोठे संकेत
PM Modi - Donald Trump : उद्या 27 ऑगस्टपासून भारतावर 50 टक्के टॅरिफ लागणार आहे. त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना एक मोठे आवाहन केले आहे. त्यांच्या या खेळीने अमेरिकन मालांवर बहिष्काराचे सत्र सुरू होणार?

उद्यापासून 27 ऑगस्टपासून भारतावर अमेरिकेचे 50 टक्के टॅरिफ आणि दंडाची अंमलबजावणी सुरू होईल. या वादावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना यश मिळत नसल्याचे समोर येत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन दौऱ्यापूर्वी देशवासीयांना मोठे आवाहन करून दिले आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या परदेशी मालाची होळी करण्यात आली होती. त्याची आठवण आता भारतीयांना पुन्हा होणार आहे. मोदींच्या खेळीने अमेरिकन मालांवर बहिष्काराचे सत्र सुरू होणार का? मोदींचे हा पाऊल कितपत यशस्वी ठरते? तुम्हाला काय वाटते?
सणासुदीच्या काळात मोदींचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सध्या सणासुदीचे सत्र आहे. गणेशोत्सव, नवरात्री, विजयादशमी, धनत्रयोदशी आणि दिवाळी अशा अनेक सणांची एकापाठोपाठ नांदी आहे. हे आपल्या संस्कृतीतील सण, उत्सव आहे. पण आता हे सणोत्सव आत्मनिर्भर भारतासाठी फलदायी ठरावे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी आग्रह धरला की, आता आपण जी पण काही खरेदी करणार ती मेड इन इंडिया असेल. मोदींनी स्वदेशीचा नारा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ट्रम्प-चीनला इशारा
पंतप्रधान मोदी हे चीनच्या दौऱ्यावर जात आहे. एकीकडे टॅरिफ तर दुसरीकडे चीनसारखा धोकेबाज देश या दोघांनाही त्यांनी मोठा संदेश दिला आहे. भारतात तयार झालेल्या वस्तूंचा, मालाचाच वापर करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सजावटीच्या वस्तू असो वा भेटवस्तू भारताने आपल्या देशात उत्पादित उत्पादने वापरूयात. तर इतर देशातून आयात केलेल्या वस्तूंची विक्री करु नये असे आवाहन ही त्यांनी व्यापाऱ्यांना केले. हे छोटे पण प्रभावशाली पाऊल आहे. त्यामुळे देशाची प्रगती आणि समृद्धी होईल असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
मी स्वदेशी वस्तू विकतो
प्रत्येक विक्रेत्याने माझ्या दुकानात भारतीय उत्पादनं, मालाची विक्री केली जाते असे बोर्ड दुकानासमोर अभिमानाने लावावे असे आवाहन केले आहे. मी स्वदेशी वस्तू विकतो अशा पाट्या दुकानदारांनी दुकानांबाहेर लावाव्यात असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात व्होकल फॉर लोकल आणि मेक इन इंडिया आपण अधिक जोर दिल्याचे ते म्हणाले. पण देशात इतर देशांचा विशेषतः चीनचा माल आयात करताच कशाला? असा सवाल विरोधकांनी केला आहे. तसेच भारतातंर्गत सर्व प्रकाराच्या वस्तूंचे उत्पादन होण्यासाठी मोदी सरकारने कोणतेही मोठे पाऊल टाकले नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मोदी सरकार केवळ जाहिरातबाजी करते, प्रत्यक्षात उद्योग आणि व्यापार धोरणातून फार मोठे काही हाती लागले नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
तर सरकारी आकड्यांनुसार, मेक इन इंडियाच्या धोरणाचा परिणाम हा मोबाईल, फार्मा आणि संरक्षण क्षेत्रात दिसून आला. या क्षेत्रात भारत स्वयंपूर्णतेकडे जात आहे. त्यातच आता भारतीय उद्योग विश्वाला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारन जवळपास 1 लाख कोटींची आयकर दिलासा आणि GST सुधाराचे पाऊल टाकले आहे. त्यामुळे देशातंर्गत विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.
