Nitin Nabin : पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे बोलले, आजपासून हेच माझे नवे बॉस
Nitin Nabin : "जनसंघाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. लक्षावधी कार्यकर्त्यांचा त्याग, तपस्या, बलिदान त्यामागे आहे. मी त्यांना आदरपूर्वक नमन करतो. जनसंघाच्या वटवृक्षातून भाजपचा जन्म झालाय. भाजप जगातील सर्वात मोठी राजकीय पक्ष बनला आहे"

“भाजप एक असा पक्ष आहे, जिथे लोकांना वाटत असेल नरेंद्र मोदी देशाचा पंतप्रधान आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. 50 वर्षाच्या छोट्या वयात मुख्यमंत्री बनले. 25 वर्ष हेड ऑफ गर्व्हमेन्ट आहेत. हे सगळं आपल्याजागी आहे. यापेक्षा मोठी गोष्ट माझ्या जीवनात ती म्हणजे मी भाजपचा कार्यकर्ता आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी कार्यकर्ता आहे, नितीन नबीन माझे बॉस आहेत. आता नितीन नबीन आपल्या सर्वांचे अध्यक्ष आहेत” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्या कार्यक्रमात पीएम मोदी बोलत होते.
“त्यांची जबाबदारी फक्त भाजप संभाळणं इतकीच नाही तर एनडीएच्या सर्व सहाकऱ्यांमध्ये कसा समन्वय राहील हे त्यांना पहावं लागेल. नितीन नबीन यांच्या संपर्कात जो आला, तो त्यांची सरळता, सहजता यावर चर्चा जरुर करतो. भाजप युवा मोर्चाची जबाबदारी असो. वेगवेगळ्या राज्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी असो किंवा बिहार सरकारमध्ये काम करण्याचा अनुभव असो. नितीन नबीन यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. जबाबदारी देणाऱ्यांनाही त्यांच्या कार्याचा अभिमान वाटला आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
येणारी 25 वर्ष खूप महत्वाची
“हे 21 व शतक आहे. या 21 व्या शतकातील पहिली 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. येणारी 25 वर्ष खूप महत्वाची आहेत. हा तो कालखंड असेल, जेव्हा विकसित भारताचं निर्माण होईल आणि ते होणार. या महत्वाच्या कालखंडाच्या सुरुवातीला नतीन नबीन भाजपचा वारसा पुढे नेतील. युवकाच्या भाषेत बोलायचं झाल्यास नितीन जी मिलेनियल आहेत. ते त्यांच्या जनरेशनचे आहेत, ज्यांनी सामाजिक, आर्थिक परिवर्तन होताना पाहिलं आहे. ते त्या जनरेशनचे आहेत, ज्यांनी रेडिओवरुन सूचना ऐकल्या आणि आता एआयचे युजर आहेत. नितीनजींकडे ऊर्जा आहे, संघटनात्मक कार्याचा दीर्घ अनुभव आहे. हे आमच्या दलाच्या कार्यकर्त्यांसाठी उपयोगी ठरेल” असं पीएम मोदी म्हणाले.
आमच्याकडे अध्यक्ष बदललात, पण आदर्श नाही बदलत
“जनसंघाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. लक्षावधी कार्यकर्त्यांचा त्याग, तपस्या, बलिदान त्यामागे आहे. मी त्यांना आदरपूर्वक नमन करतो. जनसंघाच्या वटवृक्षातून भाजपचा जन्म झालाय. भाजप जगातील सर्वात मोठी राजकीय पक्ष बनला आहे. देशाच्या राजकीय समीक्षकांनी जागला ही गोष्ट सांगितली पाहिजे, भारत एक असा देश आहे, जिथे लोकतंत्र मजबूत आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. भाजप एक संस्कार आहे. भाजप एक परिवार आहे. आमच्या इथे मेंबरशिपेक्षा रिलेशनशिप असते. भाजप एक अशी परंपरा आहे जिथे पदाने नाही प्रक्रियेने चालेत. आमच्या इथे पदभार एक व्यवस्था आहे. कार्यभार आयुष्यभराची जबाबदारी आहे. आमच्याकडे अध्यक्ष बदललात. पण आदर्श नाही बदलत. नेतृत्व बदलतं पण दिशा बदलत नाही” असं पीएम मोदी म्हणाले.
